वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी दक्षिण विभागाची बैठक उत्साहात संपन्न

रत्नागिरी, दि. २० : रत्नागिरी दक्षिण विभाग वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण सभा दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील मा. अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी असलेल्या सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा अध्यक्ष गौतम गमरे अध्यक्षस्थानी होते.

सभेचे सुत्रसंचलन व प्रस्तावना जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे यांनी केली. नुकतीच मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेशाने मान्यता दिलेल्या विस्तारीत जिल्हा समितीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही पहिलीच सभा असल्याने या बैठकीस राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व लाभले.

कार्यक्रमात जिल्हा समितीतील पदाधिकाऱ्यांची ओळख व स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा युवा आघाडी, जिल्हा महिला आघाडी आदींच्या कार्यकारिणींचा आढावा घेण्यात आला. तसेच येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारीसंदर्भात रणनीती आखण्यात आली.

या बैठकीस जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व समाजप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात चिपळूण तालुक्यातून उपाध्यक्ष सुभाष जाधव, श्रीधर सकपाळ, उपाध्यक्ष सुरेश भिसे (मातंग समाज), जिल्हा सल्लागार मारुतीकाका जोशी (कुणबी समाज), जिल्हा उपाध्यक्ष शंकर लाड, जिल्हा सहसचिव मुझफ्फर मुल्ला (मुस्लिम समाज), राजापूर तालुक्यातून रमेश पाजवे व जिल्हा महासचिव जयसिंग जाधव, रत्नागिरी तालुक्यातील उपाध्यक्ष रवींद्र कोकरे (धनगर समाज), सिद्धार्थ सावंत (जिल्हा महासचिव), अरविंद सावंत (सल्लागार), लांजा तालुक्यातून जिल्हा सचिव सिताराम कांबळे व सहसचिव राजेंद्र कांबळे, संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा सचिव चेतन नाईक (मोई समाज) यांचा समावेश होता.

तसेच जिल्हाध्यक्ष गौतम गमरे, जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे यांच्यासह तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. याशिवाय वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध जाधव, जिल्हा युवा महासचिव दिनकर कांबळे, जिल्हा महिला अध्यक्षा विरश्री बेटकर मॅडम व अनेक युवक-युवती कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

या सभेमुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली असल्याचे मानले जात आहे.

आणखी वाचा