दापोली , दि. १९ (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाच्या नियुक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. दापोलीच्या रमा बेलोसे या दापोली अर्बन बँके च्या माजी संचालक आहेत. पूज्य सानेगुरुजी विद्यामंदिर, पालगड या संस्थेच्या विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी सुरज चव्हाण,प्रदेशाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मुजीब रुमाणे, प्रदेश प्रवक्ते अजय बिरवटकर, प्रदेश युवक सरचिटणीस, साधना बोत्रे, महिला जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी. मुझफर मुकादम ता. अध्यक्ष मंडणगड. विनिता शिगवण, महिला ता. अध्यक्ष दापोली. सोनल बेर्डे, नगराध्यक्षा मंडणगड प्रियांका लेंडे, सभापती मंडणगड नगरपंचायत. नम्रता शिगवण मा. नगरसेविका दापोली. विद्या बुरटे, मा. नगरसेविका, दापोली.श्रीम.मेघा खटावकर, मा. महिला तालुकाध्यक्ष अध्यक्ष दापोली व अनेक मान्यवर उपस्थित होते. शिल्पा उर्फ रमा बिलोसे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे.








