शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न

राजापूर, दि. १३ (भरत माने): शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या सूचनेनुसार तालुका शिवसेना राजापूर तसेच युवासेनेच्यातीने राजापूर तालुक्यामध्ये मातोश्री हॉल येथे सकाळी ११.००वा. विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सदर गुणगौरव सोहळा आमदार डॉ.राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला असून त्यावेळी इयत्ता १०वी व १२वी मध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सदर गुणगौरव सोहळ्यास उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकार, विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग माने, विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर,तालुकाप्रमुख कमलाकर कदम, महिला तालुकासंघटक प्राची शिर्के, कॉलेज कक्ष निरीक्षक (महाराष्ट्र राज्य) अथर्व साळवी, युवासेना जिल्हा अधिकारी विनय गांगण, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष हातणकर, शहरप्रमुख संजय पवार, शहर संघटक वीणा विचारे, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर तसेच शिवसेना, युवासेना,महिला आघाडी, शिवसहकार सेना,ग्राहक संरक्षण कक्ष व सर्व अंगीकृत संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, माजी जी.प व पं.स सदस्य , विभागप्रमुख,उपविभागप्रमुख,सर्व नगरसेवक, आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा