आकांक्षा कदमची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सुवर्ण कामिगरी

मुंबई, दि. २४ : चेंबूर जिमखानाच्या वतीने आयोजित केलेल्या व उत्कष फायनास बँक पुर्स्स्कुत तिसऱ्या राज्य मानांकन कॅ रम स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी महिला गटाचे विजेतेपद मिळवत रत्नागिरीच्या  आकांक्षा कदम हिने सुवर्ण कामिगरी केली आहे. आकांक्षा कदम हिने अंतिम फेरीत मुंबईच्या रिंक्की कुमारीचा २५-१९ व २५-०५ अश्या सरळ दोन सेट मध्ये नमवले. उपांत्य फेरीत आकांक्षा कदम हिने मुंबईच्या नीलम घोडकेचे आव्हान तीन सेट मध्ये २२-११, १८-२५ व २५-०३ असे परतावून लावले. आकांक्षा  कदम हिच्या या सुवर्ण कामिगरी बद्दल तिचे सर्वत्र अिभनंदन करणात येत आहे.

        आकांक्षा कदम हिला तिचे मामा व शिव छ‌‍त्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री  संदीप देवरुखकर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सिचव श्री अरुण केदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.  आकांक्षा कदम हिने केलेल्या या सुवर्ण कामिगरी बद्दल रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे  सल्लागार श्री सुचयअण्णा  रेडीज, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अधक्ष श्री प्रदीप भाटकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाधक्ष श्री सुरेन्द्र देसाई, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे खिजनदार श्री नितीन लिमये व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी श्री मिलिंद साप्ते यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी वाचा