चिपळूण, दि. १८ (प्रतिनिधी): लायन्स क्लब चिपळूण आयोजित लायन्स महोत्सवामध्ये मिस् लायन्स् सुंदरी स्पर्धा लक्षवेधी ठरली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अनेक स्पर्धक तरुणींनी सहभाग घेऊन आपल्यातील कला गुण सादर केले होते.लायन्स महोत्सवाला चिपळूणवासीयांचां उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
लायन्स क्लब चिपळूण आयोजित लायन्स महोत्सव फॅमिली फन फेअरचे शहरातील भोंगाळे येथे ९ मे ते १५ मे दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे प्रोजेक्ट चेअरमन ला.दिलीप जैन यांच्या उत्कृष्ट अशा नियोजनाखाली सुमारे सात दिवस संपन्न झालेल्या या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सौंदर्य स्पर्धा यासोबतच येथे दररोज येणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्येक तासाला एक कुपनच्या आधारे सोडत काढून दररोज पाच पैठणी साड्या बक्षीस स्वरूपात भेट देण्यात आल्या होत्या लायन्स क्लबचे चिपळूण मधील सर्वच पदाधिकारी यांनी अतोनात मेहनत घेऊन संपूर्ण महोत्सव यशस्वी केला दरम्यान बुधवार दि. १५ मे रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून अनेक तरुणींनी सहभाग नोंदविला होता.
मिस लायन्स सुंदरी स्पर्धेतील विजेती विशाखा
तोडणकर, रत्नागिरी उपविजेती नम्रता जाधव , रायगड बेस्ट वॉक श्रुती निंबाळकर खेड सर्वोत्कृष्ट वेशभूषा कांचन मोहिरे, अलिबाग सर्वोत्कृष्ट फोटोजेनिक चेहरा अनुष्का कदम चिपळूण सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व प्राची जाधव.लांजा, सर्वोत्कृष्ट सादरीकरण असे यांना नामांकन मिळाले या स्पर्धेसाठी मृणाल रुमाडे, दापोली या स्पर्धेचे परीक्षिका (जज)पूजा शिर्के.मुंबई यांनी काम पाहिले. ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पहिला क्रमांक एनके कलामंच , निवळी/डांगी नृत्य, दुसरा उत्क्रांती गट, रत्नागिरी हिप-हॉप, तिसरा जय हनुमान ग्रुप (पालशेत)/नागा नृत्य, यांनी मिळवला. या स्पर्धेसाठी समीर महाडिक (देवरुख) परीक्षक (जज) म्हणून काम पाहिले.
सोलो डान्स स्पर्धेत पहिली साजिरी पावसकर आणि ओम साटम दुसरी , सानिका सावंत आणि अमन शेख तर तिसरा शिवराज कोंडेकर यांनी मिळविला या स्पर्धेचे परीक्षक म्हणून किरण बोरसुटकर यांनी काम पाहिले. मदर डॉटर/सन सौंदर्य स्पर्धेत विजेती. मयुरी काटकर, आई जिजा काटकर. मुलगी, उपविजेता गायत्री कदम. आई, समर्थ कदम.मुलगा सर्वोत्तम कामगिरी-वंदना बिस्वास आई, आरव बिस्वास. मुलगा, सर्वोत्तम पोशाख -श्रुती भागडे (आई) / सान्वी भागडे (मुलगी) सर्वोत्तम फोटोजेनिक चेहरा-कश्मिरा पवार (आई) / प्रार्थना पवार (मुलगा) यांनी नामांकन मिळविले तर या स्पर्धेचे परीक्षक (जज) म्हणून सागर शिरकर चिपळूण यांनी काम पाहिले. १० मे रोजी झालेल्या फोक ग्रुप डान्स स्पर्धेत जय हनुमान ग्रुप आणि आगरी देवी कलामंच ग्रुप (पालशेत) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सात दिवस चाललेल्या फॅमिली फन फेअर मधून आलेल्या नागरिकांमधून तिकीट कूपन द्वारे दररोज पाच विजयी व्यक्तीला पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येत होती.
या मध्ये नवाज पगारकर काविळतळी, महेश कोळपे चिपळूण, प्राची कदम, संदेश वाजे सावर्डे, सुरेश चव्हाण भिले, श्री.लिगारे चिपळूण, अश्विनी गुढेकर मुरादपूर, सुरजीत चव्हाण पेढाबे, संगीता काटकर चिपळूण, सोनाली साळवी गोवळकोट, सचिन विचारे, हनिफ शेख गोवळकोट, अली पगारकार अंजेनवेल माधुरी सावंत खेर्डी, विनय बंगाल चिपळूण यांचा समावेश होता.
प्रांताधिकारी आकाश लिंगाडे,चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम, जयद्रथ खताते, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, दापोली लायन्स क्लबचे अतुल मेहता, झोन चेअरमन मनोहर जैन, देवरूख लायन्स , खेड सावर्डे , मालवण लायन्स क्लबचे सदस्य व इतर मान्यवर मंडळींनी लायन्स महोत्सवाला भेट दिली. प्रोजेक्ट चेअरमन ला. दिलिप जैन,लायन्स् महोत्सव कमिटीचे ला. अमर शेट्ये , ला. विजय रतावा, ला.शिरीष मुळे, ला. अजय भालेकर, ला. श्रीनिवास परांजपे, ला अरूण कदम व लायन्स क्लब अध्यक्ष लहुष चितळे, सेक्रेटरी ला.. नंदकुमार चिटनिस, ला. वसंतशेठ उदेग, यांच्यासह खजिनदार ला. मिलिंद गोंधळी, ला.शांतीलाल गांधी, ला.मिलिंद मुद्राळे, ला.जगदीश वाघुळदे ला. डॉ.विजय रीळकर ला. रमेश रेळेकर ला. तुषार गोखले, ला. राजन इंदुलकर, ला.चंद्रकांत कुलकर्णी, ,ला.किसन चिपळूणकर, ला.डॉ. अशोक केतकर, ला. विजय ओसवाल ला . नितीन गांधी, ला. राजेंद्र वेस्विकर, ला. सचिन शेठ, ला. जयंत नाईक, ला. तुषार गोखले, ला. जयअण्णा शेट्टी यांनी व स्टूडियो तेवीसचे हर्षद चव्हाण, रविना शिर्के व सखी थरवळ यांनी संपूर्ण लायन्स महोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सतत सात दिवस चाललेल्या या महोत्सवाचे सूत्रसंचालन सखी थरवळ यांनी केले.








