पुणे, दि. २५ (पीएसआय वृत्तसंस्था): राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाचा हाहाकार झाला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तर, दुसरीकडे मुंबईतही पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. परिणामी कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार

पावसामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात १६.५० मीटर ही इशारा पातळी आहे. तर १७.५० मीटर ही धोका पातळी आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
दरम्यान पुणे शहर आणि परिसरात संततधारेमु

ळे ३८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
रात्रभर मुसळधार पाऊस झाला पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. एका पाठोपाठ झाड कोसळण्याच्या घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवण्यात आल्या.
या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध
खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे.
भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.
“पुण्यात कालच रेड अलर्ट दिला होता- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे व आसपासच्या भागात अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Pune Rain Red Aert) बुधवारीच देण्यात आला होता, असं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. “रेड अलर्ट कालच देण्यात आला होता. आज पुणे-पिंपरी-चिंचवडच्या शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं कमी भरली होती. त्यामुळे पुण्याला निम्मा काळच पाणी पुरेल अशी स्थिती होती. पण आपल्याकडचं खडकवासला धरणं पावणे तीन टीएमसीचंच आहे. खडकवासलाच्या वरच्या भागात ८ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंच पाऊस झाला”, असं अजित पवार म्हणाले.
सिंहगड रस्त्यावर NDRF ची दोन पथके कार्यरत ; मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट
मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यालगतच्या नदीपात्रातील सोसायट्यांमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी NDRF ची दोन पथके कार्यरत आहेत.
नागरिकांना माझी विनंती आहे, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही !
बचावकार्यासाठी प्रशासन सज्ज-
पुण्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमध्ये एनडीआरएफची बचावपथकं काम करत आहेत. त्याचवेळी राज्याच्या इतर भागातही एनडीआरएफ, एसडीआरएफची पथकं सज्ज असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. “आत्ता मुंबईत कुर्ला-घाटकोपरला एनडीआरएफच्या दोन, ठाण्यात एक, रायगड एक, पालघर एक, रत्नागिरी २, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक, मुंबईत स्टँडअलोन तीन पथकं, पुण्यात ३ व नागपूरला १ अशी १८ एनडीआरएफची पथकं तयार आहेत. एसडीआरएफची सहा पथकंही सज्ज आहेत”, असं ते म्हणाले.








