संगमेश्वर, दि. १८ (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यामध्ये चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे असे असतानाच संगमेश्वर जवळच्या निढळेवाडी येथे चौपदरीकरण हातानेच करण्यात येत आहे मात्र असे असतानाही शासकीय अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने संगमेश्वर तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.
गेले दहा वर्ष रखडलेल्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात धीम्या गतीने सुरू आहे. चौपदरीकरणाच्या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. निडळेवाडी येथे चक्क यांत्रिक मशीन न वापरता हातानेच चौपदरीकरण करण्यात येत आहे.
चौपदरीकरणाचे काम करत असताना शासकीय अधिकारी असते मात्र अनेक ठिकाणी शासकीय अधिकारीच सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी आणि वाहन चालक यांनी केलेला आहे. अनेक वेळा सांगूनही शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निढळेवाडी येथे सुरू असलेल्या निकृष्ट कामाबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे तसे न केल्यास जनता रस्त्यावर उतरेल असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.








