वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित महिला समृद्ध महोत्सवाचे शानदार उद्घाटन

चिपळूण, दि. ०१ (प्रतिनिधी): वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने महिला बचत गटांसाठी व्यवसायभिमुख नाविन्यपूर्ण महिला समृद्धी महोत्सव उपक्रम आयोजित करून आदर्श निर्माण केला आहे.  विशेष म्हणजे  वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने गेल्या दोन वर्षांत घेतलेली भरारी पाहता संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल,  असा विश्वास चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित महिला  समृद्धी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. तर या महोत्सवाचे मान्यवराने भरभरून कौतुक केले.
शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलासमोरील मैदानात वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित महिला समृद्धी महोत्सवाचे उद्घाटन चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून तर अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, ऍड. नयना पवार, चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, माजी नगराध्यक्ष सौ. सावित्री होमकळस, सौ.  सुरेखा खेराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, माजी नगरसेवक शिरीष काटकर, कबीर काद्री,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, सौ. रुपाली कदम, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. राधा शिंदे, शहराध्यक्षा डॉ. सौ. रेहमत जबले,  कार्यध्यक्षा सौ. अंजली कदम, सौ. रुही खेडेकर, शिवसेना उबाठा चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. ऐश्वर्या घोसाळकर, माजी पंचायत समिती सदस्या सौ. रेश्मा पवार, सौ. सुप्रिया भुवड, सौ. मानसी भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय देसाई, माजी नगरसेवक रमेश खळे, अरुण भोजने, संजय तांबडे, मनोज शिंदे, सुरेश राऊत, शेखर लवेकर, वैश्य युवक जिल्हाध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक सतीश खेडेकर, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, माजी नगरसेविका सौ. सीमा रानडे, सौ. गौरी रेळेकर,  सौ. सफा गोठे, सौ. रसिका देवळेकर, श्रीमती अश्विनी वरवडेकर, सौ. श्रद्धा कदम, सौ. रंजिता ओतारी,  हिंदुराव पवार, लायन्स क्लबचे अध्यक्ष विजय रतावा, शिरीष मुळे, अजय भालेकर, प्रसाद लाड, फैयाज देसाई, अन्वर जबले, फैसल पिलपिले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुभाषराव चव्हाण यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना ‘सहकारातून समृद्धी’  राबवण्यात यश आले. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासताना चिपळूण नागरी ‘सहकारात मॉडेल’ म्हणून काम करीत आहे. तर आता आपण शेतकऱ्यांसाठी पाहिलेले स्वप्न वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. तर महिला समृद्धी महोत्सवाच्या कार्यक्रमाने आपण भारावून गेलो आहोत, असे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.
तर माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या मनोगतात ‘भावी आमदार’  म्हणून प्रशांत यादव यांचा उल्लेख करतांना सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे?  सर्वसामान्यांचे दुःख निवारण करण्यासाठी काय केले पाहिजे ? बेकारी कशी दूर होईल? याचे व्हिजन प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून उराशी बाळगल्याबद्दल यादव यांचे कौतुक केले. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादित मालासाठी तुम्ही आमदार झाल्यावर प्रथम महिला बचतगटांसाठी भवन उभे करण्याची भूमिका घ्या. महिला भगिनीं तुम्हाला नक्कीच भाऊबीज देतील, असा विश्वास दिला.
यावेळी रमेश कदम पुढे म्हणाले की, कोकणात सहकार अनेकांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. परंतु सुभाषराव चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने चिपळूण नागरीच्या माध्यमातून २५ वर्षांपूर्वी रोपट लावलं. मध्यंतरी हा फुगा कधीतरी फुटणार असं लोकांमध्ये थोडसं संभ्रमाचे वातावरण होते. परंतु फुगा फुटणार म्हणणाऱ्यांना या संस्थेचा वटवृक्ष कधी झाला हे समजले नाही. या संस्थेने सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले आहे, अशा शब्दात चिपळूण नागरी आणि सुभाषराव चव्हाण यांचे माजी आमदार रमेश कदम यांनी कौतुक केले.
प्रशांत यादव यांच्याकडे व्हिजन!
ते आणखी पुढे म्हणाले की, प्रशांत यादव यांच्याकडे व्हिजन असून  वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची दुःखद समजावून घेण्याबरोबरच रोजगारनिर्मितीसाठी ते प्रयत्न करीत आहेत. तुम्ही चांगलं काम करताय, तुम्हाला आमची अखंड साथ राहील, अशी ग्वाही देतांना  चांगला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम कराल, असा आम्हाला विश्वास असल्याचे माजी आमदार रमेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोकण स्वयंपूर्ण बनवण्याचा ध्यास- प्रशांत यादव
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतातून वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून महिला बचतगटांना सक्षम करण्याचा प्रयत्न असून या बचत गटांना मार्केटिंग व ब्रँडिंग स्किल जमलं पाहिजे,  या हेतूने महिला समृद्धी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. वाशिष्ठी डेअरीच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.  वाशिष्ठी डेअरीने  मधल्या काळात प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. वाशिष्ठी डेअरी ‘ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग’ या दोन तत्त्वांच्या आधारे यशस्वी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय शंभर टक्के देण्याचा आमचा मानस आहे आणि तो पुढच्या काळात होईल असा आमचा विश्वास आहे.चिपळूण नागरी चे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचे ‘सहकार क्षेत्र मिशन’ होते. तसेच कोकण स्वयंपूर्ण बनवण्याचा आमचा ध्यास आहे, अशी  आपली पुढील दिशा  स्पष्ट करतांना महिला बचत गटांना दिशा द्यायची आहे. आम्ही ब्रँडिंगसाठी आमच्या शॉपी उघडल्या आहेत. या शॉपीच्या माध्यमातून आम्ही आमचा स्वतःचा ब्रँड केला. आता आम्ही हा ब्रँड बचत गट आणि महिलांकडे देतोय.  याची सुरुवात देवरुख येथील महिला बचतगटासाठी शॉपी देऊन करीत आहोत, असे नमूद करतांना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची बचत गटांसाठीची दिशा स्पष्ट केली. या प्रकल्पाच्या वाटचालीत पत्नी व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या खंबीर साथीबद्दल कौतुक केले.
यावेळी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर,  माजी नगरसेवक विजय चितळे, माजी सभापती रामदास राणे, माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष जगदीश वाघुळदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. ऐश्वर्या घोसाळकर, माजी नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक विजय चितळे आदींनी आपल्या मनोगतात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करताना महिला समृद्धी महोत्सवाच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले.यावेळी माजी नगरसेविका सौ. सुषमा कासेकर, मानसी भोसले, खेळच्या सरपंच सौ. अश्विनी पंडित,  उपसरपंच  सौ. सुप्रिया उतेकर, श्रीमती स्नेहलता खातू, जयवंत शिंदे, विलास चिपळूणकर, रोहन चौधरी, संकेत कदम, महेश महाडिक, मुना दळी, डीबीजे कॉलेजच्या सीनियरच्या माजी प्राचार्य श्रीमती बिराजदार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठीची दिशा स्पष्ट केली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.

आणखी वाचा