अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीला आणखी बळ: नाना पटोले

नागपूर/मुंबईदि १ एप्रिल :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देशभरात रुजविला त्या सर्व आंबेडकरी-पुरोगामी चळवळीतील सहकारी सोबत आल्याचा आनंद आहे. रिपब्लकिन पक्षाच्या पाठिंब्याने मविआ आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. केंद्र सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करुन महाविकास आघाडी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचारात सहकार्य होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रविण ऊर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी खोब्रागडे यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. ते पुढे म्हणाले कीभाजप प्रणित केंद्र सरकारने मागील दहा वर्षात जातीय तेढ निर्माण करून अराजकता पसरविण्याचे काम केले आहे. संविधानातील हक्क आणि अधिकार यांना पायदळी तुडवून लोकशाहीची थट्टा केली आहे. आरक्षणरोजगारमहिला सुरक्षा हे सर्व मुद्दे दुर्लक्षित करण्यात आल्याने भाजपा सरकारला सत्तेतून पायउतार करायचे असेल तर सर्व धर्मनिरपेक्ष पुरोगामी शक्तींनी एकत्रित येऊन संविधान आणि लोकशाही अबाधित राहावी यासाठी एकत्रित लोकसभा निवडणुकीत प्रचार करणे गरजेचे आहे.

यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वझाहत मिर्झाकाँग्रेस प्रदेश सचिव विजय नळेरिपब्लिकन पक्षाचे महासचिव घनश्याम फुसेउपाध्यक्ष अशोक निमगडेकोषाध्यक्ष प्रतीक डोर्लीकरस्टूडंट फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. राजस खोब्रागडेप्रदेश अध्यक्ष मिलिंद तायडेकेंद्रीय समिती सदस्य संजय पाटीलविशाल अलोनेसुरेश पानतावणेगुलाब नंदेश्वरप्रेमदास बोरकरअनुप चिंचखेडेचंद्रकांत दहिवळेसिद्धार्थ पाटील आदी उपस्थित होते.

आणखी वाचा