पाली /बेणसे दि. २१ (धम्मशील सावंत): सुधागड तालुक्यातील मॅकमोहन हुले यांच्या ‘मॅकविला द जंगल यार्ड’ च्या गिर्यारोहकांनी, माहुली’ गड अ’ समुहातील चिरा सुळक्यावर अवघड चढाई रविवारी (ता. 17) सर केली.
या मोहिमेत सुधागड तालुक्यातील पोटलज गावातील मॅकमोहन हुले, ठाणे येथील साधना चंदणशीवे व सुरज तावडे, डोंबिवली येथील सागर मैस्त्री आणि कल्याण येथील वैषाक कुमार सहभागी झाले होते. शुक्रवारी (ता. 15) हे सर्वजण माहुली गड पायथ्याशी पोहोचले. यावेळी सर्वांनी रकसॅक मध्ये असलेले साहित्य, शिधा, रोप, पाणी, तंबु, इतर सर्व रकसॅक सामान लोड करुन घेतले. सागर मैस्त्रीयांनी गाईड-लाइन करून संपूर्ण प्रस्तरारोहण मोहीम लीड केली. सर्व सुचनेनुसार ट्रेकला सुरुवात केली. एक तासाचा अंतरावर 4 वाजता तंबु लाऊन रात्र काढली. शनिवारी (ता 16) सकाळी 7 वाजता माहुली गड ट्रेक सुरूवात केली. गडावर महादरवाजा येथे बाराही महीने पाण्याची एकमेव ठिकाण असल्याने दुपारचे भोजन करुन मुबलक पाणी घेऊन चिरा सुळक्याच्या दिशेने प्रस्तरारोहक निघाले. सुळका आणि गडाचा किनार्यावर असलेल्या झाडाखाली 3 तंबु लावुन दुपारची विश्रांती घेतली. माहुल ‘गड समुहात असणारे चिरा, लगभग 2 सुळके आहेत.
झाडालगत खिंडीतुन सुळक्यांजवळ पोहचता येते. वरील झाडाला ८० मीटर दोर बांधून घेणे. चिरा सुळक्यावरील प्रस्तर बाजू ही सरळ-ठिसूळ, प्रस्तरात्मक खिळे निकामी झाले असुन, या ठिकाणी काही कालांतराने चढाई होत असल्याने 3 वेळा प्रस्तरात्मक खिळे नव्याने वापरण्यात आले होते, आताचे असलेले प्रस्तरात्मक खिळे १० वर्ष जुने असावेत. येथुन सुरक्षित चढण्याचा अंतिम निर्णय झाला. सायंकाळचे पाच वाजले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी चढाई करायचे ठरले. उर्वरित वेळात प्रस्तरारोहक माहुलीगड व भंडारगड वरील असलेली वास्तू, मार्ग, पाण्याचे ठिकाण, धान्य कोठार, तलाव, वाडे, भंडारगड लगत असलेले सुळके समूह- ब’ यांची पाहणी केली. त्यांनतर महादरवाजा येथे पाणी भरुण बेस कॅम्प-कडे परतले.
रविवारी (ता.17) पहाठे सर्व आवरूण सुळक्याच्या दिशेने निघाले. बेस कॅम्पवर सुरज तावडे थांबला होता. 9 वाजता आरोहणाला सुरवात केली. प्रथम मॅकमोहन याना सुरक्षा दोर सागर मेस्त्री यांनी दिला. पहिले 3 प्रस्तरात्मक खिळे बदलुन पुढील चढाई कृत्रिम आरोहण केली. पाचर वापरून, सुरक्षित असलेले एक्स्पॅडेड बोल्ट आहेत. ५० फुट आरोहण करून त्यानंतर उजवीकडे २० फुट वळसा घालून कंगोऱ्यात एक प्रस्तरात्मक खिळा आहे. येथे मोठी लेज आहे. याठिकाणी 3 ते 4 आरोहक उभे राहु शकतात. दुसरे आरोहण साधना चंदनशीवे हिने सुरक्षा दोर, झुमार आधारे पहीला टप्पा इक्विपमेंट काढत कस लावुन वळसा लेज-कंगोऱ्यात पाऊण तासात पोहोचली. मागोमाग सागर सुध्दा लेज-कंगोऱ्यात पोहोचला. अंतिम टपा ५० फुट निसरडा, ठिसुळ होता. दुपारी दोन वाजता तिघेही माथ्यावर पोहोचले. संपूर्ण टिमच्या संयमाने संगठित आरोहण पूर्ण केले. त्यांनतर सर्व बेसकॅम्पवर सायंकाळी पाच वाजता पोहचले.








