रत्नागिरी, दि. ०२ (प्रतिनिधी): नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस पी हेगशेट्ये महाविद्यालयाच्या बीएससी हॉस्पिट्यालिटी हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी तंदुरी नाईटस् या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवादरम्यान संगीतमय करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी केले आहे.
कोकणातील ग्रामीण भागातील वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमक्रमा बरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे एकमेव महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. शिक्षणाच्या हक्कासाठी हे ब्रीद घेऊन 1998 साली स्थापन झालेल्या या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष अल्पावधीतच रत्नागिरी, दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) आणि संगमेश्वर येथे महाविद्यालयं सुरू करुन विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देत आहे. या शैक्षणिक वर्षात 6000 विद्यार्थी केजी टू पीजी पर्यंत चे विविध विभागातून शिक्षण घेत आहे.
स्थानिक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिले जाणारे शिक्षण दिले जाते.
या माध्यमातून हॉटेल इंडस्ट्री, कार्पोरेट सेक्टर, आयटी इंडस्ट्री, सेल्फ एम्प्लॉयमेंट अशा विविध क्षेत्रात महाविद्यालयातून शिक्षण अनेक विद्यार्थी आज देशात आणि परदेशात जाऊन आपली स्वप्ने साकार करीत आहेत. नवनिर्माण शिक्षण संस्थेने 2012 या शैक्षणिक वर्षी हॉटेल मॅनेजमेंटची स्थापन केली. हे शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र आणि जवळच्या राज्यांच्या सीमा भागातील असंख्य विद्यार्थी प्रवेश घेतात. महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली देशातील आणि परदेशातील अनेक हॉटेल मध्ये इंटरन्सशिप, प्रात्यक्षिक शिक्षणाचा भाग पूर्ण करण्याची संधी या माध्यमातून प्राप्त झाली.
क्रुझ, फ्लाईट, रेस्टॉरंट, पर्यटन क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमा कडे वळत आहेत. कोरोना ओसरल्यानंतर प्रथमच या वर्षी तंदुरी नाईटस् या खाद्य महोत्सवाचे बहारदार आयोजन करण्यात आले आहे. या खाद्य महोत्सवामध्ये विशेष करुन अफगानी पणीर टिक्का, भट्टीदा नझाकत आलू, पनीर हैदराबादी, मुघल शबनम करी, भट्टीदा मुर्घ, मुर्घ आलिशान टिक्का, मुर्घ जहापनाह, मटन मुमताझ या पदार्थांची विशेष चव चाखता येणार आहे.
त्याच बरोबर शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे विशेषकरून व्हेज नॉनव्हेज सुप, चाट, व्हेज नॉनव्हेज तंदुरी स्टार्टर, व्हेज नॉनव्हेज स्ट्रीट फूड, व्हेज नॉनव्हेज कोंबो मिल, व्हेज नॉनव्हेज बिर्याणी, डेझर्ट त्याचबरोबर तवा आईस्क्रीम, ल्फैरोलॉजी, फ्रूट कार्व्हिंग यांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत.
या दरम्यान बहारदार संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. या बाबतीत अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे 7719851025 यांच्याशी संपर्क साधावा.








