चिपळूण, दि. १६ : खडपोली एमआयडीसी परिसरातील साफिस्ट कंपनीत अचानक करण्यात आलेल्या कामगार कपातीविरोधात संतप्त कर्मचार्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाला आज भारतीय जनता पक्षाचे नेते प्रशांत जी यादव यांनी भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.
यादव यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाची दखल तातडीने घ्यावी, अशी मागणी केली. कामगारांच्या अडचणींवर तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. भेटीदरम्यान त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामगारांसोबत अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण दक्षिण मंडल तालुकाध्यक्ष विनोद भुरण, तसेच रुपेश आवले, राहुल पवार, अभिनव भुरण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कामगार कपातीमुळे अचानक उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने या आंदोलनाला स्थानिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळत आहे.








