चिपळूण नगरपालिकेत महायुतीचा दणदणीत विजय; उमेश सकपाळ नगराध्यक्षपदी विराजमान

चिपळूण, दि. २१ : चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट आणि निर्णायक कौल देत महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत श्री. उमेश धोंडीराम सकपाळ यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत नगरपालिकेच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. या निकालामुळे चिपळूण नगरपालिकेत महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असून, विकासाभिमुख, गतिमान व पारदर्शक प्रशासनाची अपेक्षा नागरिकांकडून नव्या नगरपरिषदेपुढे व्यक्त होत आहे.

नगराध्यक्ष व प्रभागनिहाय विजयी उमेदवार

नगराध्यक्ष :
श्री. उमेश धोंडीराम सकपाळ

प्रभाग क्रमांक १
▪️ जागा अ – नाखुदा मिसबा अजगर
▪️ जागा ब – जुळे उदय विठ्ठल

प्रभाग क्रमांक २
▪️ जागा अ – सौ. सफा दिलबर गोटे
▪️ जागा ब – सरगुरोह साजिद हनीफ खान

प्रभाग क्रमांक ३
▪️ जागा अ – दांडेकर रूपाली राकेश
▪️ जागा ब – बुरटे प्रमोद सुभाष

प्रभाग क्रमांक ४
▪️ जागा अ – अजय पांडुरंग भालेकर
▪️ जागा ब – वैशाली विलास कदम

प्रभाग क्रमांक ५
▪️ जागा अ – कोवळे निहार हेमंत
▪️ जागा ब – नसरीन खडस

प्रभाग क्रमांक ६
▪️ जागा अ – निमकर वैशाली मधुकर
▪️ जागा ब – गोताड संजय चंद्रकांत

प्रभाग क्रमांक ७
▪️ जागा अ – भिसे संदीप अशोक
▪️ जागा ब – हर्षली संदेश पवार

प्रभाग क्रमांक ८
▪️ जागा अ – वांगडे साईनाथ नजीर
▪️ जागा ब – योगेश जगन्नाथ पवार

प्रभाग क्रमांक ९
▪️ जागा अ – अंजली सतीश कदम
▪️ जागा ब – मोदी शशिकांत श्रीकांत

प्रभाग क्रमांक १०
▪️ जागा अ – देवळेकर रसिका रत्नदीप
▪️ जागा ब – विक्रांत उर्फ कपिल विठ्ठल शिर्के

प्रभाग क्रमांक ११
▪️ जागा अ – नीलम सीताराम जाधव
▪️ जागा ब – अंकुश आवले

प्रभाग क्रमांक १२
▪️ जागा अ – उमा उदय देसाई
▪️ जागा ब – पिसे शुभम दयानंद

प्रभाग क्रमांक १३
▪️ जागा अ – गणेश आग्रे
▪️ जागा ब – महाडिक पल्लवी मोहन

प्रभाग क्रमांक १४
▪️ जागा अ – शिंदे कांचन सुमित
▪️ जागा ब – मिथिलेश विकी नरळकर

पक्षनिहाय संख्याबळ

शिवसेना (शिंदे गट) : ९

भाजप : ७

शिवसेना (ठाकरे गट) : ५

काँग्रेस : ३

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : २

या निकालामुळे चिपळूणच्या राजकारणात महायुतीचे बळ अधिक मजबूत झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा