मुंबई महानगरपालिका निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दुसरी यादीही लवकरच

मुंबई, दि. २८ डिसेंबर : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गेले काही दिवस उमेदवार यादी जाहीर होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना अखेर आज निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली यादी जाहीर करण्यात आली.

जाहीर झालेल्या यादीत मुंबईतील विविध वॉर्डमधील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून पक्षाने महिला, अल्पसंख्याक तसेच अनुभवी व नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे चित्र आहे. पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच स्थानिक पातळीवरील सामाजिक कामगिरीचा विचार करून उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पहिल्या यादीत वॉर्ड क्रमांक ३ मधून मनिष दुबे, वॉर्ड ४८ मधून सिरील पिटर डिसोझा, वॉर्ड ६२ मधून अहमद खान, वॉर्ड ७६ मधून बबन रामचंद्र मदने, वॉर्ड ८६ मधून सुभाष जनार्दन पाताडे, वॉर्ड ९३ मधून सचिन तांबे, वॉर्ड ९६ मधून आयेशा शाम्स खान, वॉर्ड १०९ मधून सज्जू मलिक, वॉर्ड ११३ मधून शोभा रत्नाकर जाधव, वॉर्ड १२५ मधून हरिश्चंद्र बाबालिंग जंगम, वॉर्ड १३५ मधून अक्षय मोहन पवार, वॉर्ड १४० मधून ज्योती देविदास सदावर्ते, वॉर्ड १४३ मधून रचना रविंद्र गवस, वॉर्ड १४६ मधून भाग्यश्री राजेश केदारे आणि वॉर्ड १४८ मधून सोमू चंदू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय वॉर्ड १६५ मधून अब्दुल रशीद (कप्तान) मलिक, वॉर्ड १६९ मधून चंदन धोंडीराम पाटेकर, वॉर्ड १७१ मधून दिशा अमित मोरे, वॉर्ड २२४ मधून सबिया अस्लम मर्चंट, वॉर्ड ४० मधून विलास दगडू घुले, वॉर्ड ५७ मधून अजय विचारे, वॉर्ड ६४ मधून हदिया फैजल कुरेशी, वॉर्ड ७७ मधून ममता धर्मेंद्र ठाकूर, वॉर्ड ९२ मधून युसूफ अबुबकर मेमन, वॉर्ड ९५ मधून अमित अंकुश पाटील, वॉर्ड १११ मधून धनंजय पिसाळ, वॉर्ड १२६ मधून प्रतिक्षा राजू घुगे, वॉर्ड १३९ मधून नागरत्न बनकर, वॉर्ड १४२ मधून चांदणी श्रीवास्तव, वॉर्ड १४४ मधून दिलीप हरिश्चंद्र पाटील, वॉर्ड १४७ मधून अंकिता संदीप द्रवे, वॉर्ड १५२ मधून लक्ष्मण गायकवाड, वॉर्ड १६८ मधून डॉ. सईदा खान, वॉर्ड १७० मधून बुशरा परवीन मलिक, वॉर्ड १७५ मधून वासंथी मुरगेश देवेंद्र, वॉर्ड २२२ मधून किरण रविंद्र शिंदे आणि वॉर्ड १९७ मधून फरीन खान यांचा समावेश आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसरी उमेदवार यादीही लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले असून उर्वरित वॉर्डसाठी उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. पहिल्या यादीच्या घोषणेमुळे मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे.

आणखी वाचा