वाटद-खंडाळा येथे जिजाऊ संस्थेच्या मोफत शिवणकाम प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ; २०० महिलांचा सहभाग

वाटद-खंडाळा (ता. रत्नागिरी), दि. ३ : जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, खंडाळा केंद्राच्या वतीने आयोजित “मोफत शिवणकाम प्रशिक्षण” उद्घाटन सोहळा, खेळ पैठणीचा व हळदी कुंकू समारंभ आज (शनिवार) वाटद, खंडाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. क्रांतीवीर सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास वाटद पंचक्रोशीतील सुमारे २०० महिलांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळ पैठणीमध्ये सौ. आराध्या पवार व सौ. तन्वी ताम्हणकर या मानकरी ठरल्या. तसेच इतर खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २० महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.

जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट महेंद्रजी मांडवकर व तालुकाध्यक्ष मंदारजी नैकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांसमवेत त्यांचा वाढदिवसही आनंदात साजरा करण्यात आला.

मोफत शिवणकाम प्रशिक्षणाचे उद्घाटन जिजाऊ संस्था महाराष्ट्र सचिव केदारजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष ऍड. महेंद्रजी मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदारजी नैकर व सौ. प्रणाली गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

खंडाळा केंद्र प्रमुख दीपक सांबरे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते केशव बलेकर व नितीन वीर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच महिला कार्यकर्त्या वर्षा राजे निंबाळकर, सौ. निधी वीर, सौ. दिक्षा जंगम, सौ. मंजुषा झगडे व श्रुती जंगम यांनी हळदी कुंकू समारंभाच्या नियोजनापासून सांगतेपर्यंत कार्यक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार शिंदे यांनी केले, तर छायाचित्रणाची जबाबदारी सौ. प्राजक्ता जंगम यांनी पार पाडली.

जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे यांच्या समाजसेवेच्या कार्याचा लाभ वाटद विभागातील गरजू महिलांपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे पोहोचेल, असा विश्वास रत्नसिंधू न्यूज मीडियाच्या संस्थापिका व संपादिका वर्षा राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा