त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी : पंचशील क्रीडा मंडळ, तिसगाव विभाग (चिपळूण) यांचा उपक्रम

चिपळूण, दि. १४ :- पंचशील क्रीडा मंडळ, तिसगाव विभाग चिपळूण यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष विशाल तुळशीराम मोहिते यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमास सामाजिक, धार्मिक व स्थानिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक विकास ग्रुपचे मुख्य प्रवर्तक व समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी धम्मवंदना व त्रिशरण गाथा म्हणत माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन केले.

यावेळी माता रमाई यांच्या कार्याचा व संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करण्यात आला. समाजात समता, बंधुता आणि ऐक्य टिकवून ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास राजेंद्र मोहिते, मनोहर मोहिते, अंकुश गमरे, विरेंद्र जाधव, सीमा मोहिते, प्रणाली मोहिते, कमला मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमातून समाजात ऐक्य, समता व बंधुतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पंचशील क्रीडा मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

आणखी वाचा