चिपळूण, दि. ०१ : चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर सौ. सारिका श्रीनाथ खेडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल आमदार शेखर निकम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सारिका खेडेकर या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून, त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासू वृत्तीचा बँकेच्या प्रगतीसाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास आमदार निकम यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे चिपळूणच्या सहकार क्षेत्रातील महिला नेतृत्व अधिक सक्षम झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, समीर जानवलकर, जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन साडविलकर, वरुण गुडेकर, संदीप जागुष्टे, विजय भुवड, रघुनाथ भालेकर यांच्यासह खेडेकर कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.







