उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार निकम यांनी समाजमंदिर हे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे, शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा आणि स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले. समाजमंदिराच्या उर्वरित विकासकामांसाठीही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मीनल काणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ आबू ठसाळे आणि पांडुशेठ माळी यांनी मनोगत व्यक्त करून समाजमंदिर उभारणीतील योगदानाचा आढावा घेतला. या वास्तूमुळे समाजातील विविध कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला विलास वाजे, संजय जाधव, सुरज कदम, प्रभाकर सैतवडेकर, महेंद्र भुवड, उमेश सकपाळ, रिया गोंधळेकर, विजय दिवेकर, गोकुळ मिंडे यांच्यासह भोई समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजमंदिरामुळे भोई समाजाची सामाजिक व सांस्कृतिक एकजूट अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







