यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि माजी आमदार डॉ. विनय नातू प्रमुख उपस्थित होते. आमदार निकम यांनी नॅबचे अध्यक्ष निलेश भरणे, कार्यवाह भरत नांदगावकर, खजिनदार नयन साडविलकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्कराज नारखेडे आणि संपूर्ण कार्यकारिणीचे कौतुक केले.
नॅब आय हॉस्पिटलच्या माध्यमातून अंध व्यक्ती, दृष्टिदोष असलेले नागरिक आणि गरजू रुग्णांना नेत्रतपासणी व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार महत्त्वाचे असून, नव्या बाह्यरुग्ण तपासणी कक्षामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नॅबच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांची आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. या सुविधेमुळे चिपळूणसह परिसरातील गरजू रुग्णांना नेत्रसेवेचा लाभ मिळणार आहे.
यावेळी मिलिंद कापडी, सुचय रेडीज, निलेश भरणे, भरत गांगण, डॉ. मिलिंद गोखले, नयन साडविलकर, सूर्यभान साळुंखे, बाबू तांबे, समीर जानवलकर, भरत नांदगावकर, सतीश वीरकर, अदिती देशपांडे, राधिका पाथरे, दादा खातू, विजय सावंत, सोनाली खर्च, ऋषी थरवळ, ओंकार रेडीज यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.







