लेट्स इमॅजीनचा बाप्पा साहित्य प्रसाद उपक्रम

मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : बाप्पाच्या दर्शनाला येतांना फळं, मिठाई प्रसादासाठी आणण्याऐवजी  वह्या, पेन्सिल, पेन, पट्टी, स्केचपेन, असे शैक्षणिक साहित्य आणावे,  जे   वाडा  आणि विक्रमगड या आदिवासी भागात असलेल्या शाळांमधील आपल्या छोट्या दोस्त मंडळींना  देता येतील, असे आवाहन लेट्स इमॅजिन टूगेदर फाउंडेशन ने केले आहे.   लेट्स इमॅजिनचा बाप्पा साहित्य प्रसाद उपक्रम आहे जो गेली ५ वर्ष ते राबवत आहेत. अशी माहिती दहिसर येथील लेट्स इमॅजीनच्या  पूर्णिमा  नार्वेकर यांनी दिली. आपणही या उपक्रमांत सहभागी होऊ शकता. आपल्या घरी  बाप्पा येत असेल तर आपण सुध्दा हा उपक्रम आपल्या  घरी  करू शकता, असे ही पूर्णिमा  नार्वेकर यांनी सांगितले.  या आवाहनाला  चांगला प्रतिसादही   मिळालाआहे.  १८ जणांनी यात सहभाग घेतला आहे. या उपक्रमाविषयी अधिक  माहिती जाणून घेण्यासाठी सौ. पूर्णिमा नार्वेकर यांच्या समवेत ९८२०००३८३४ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा