लघुउद्योजक महिलांच्या स्वामी ग्राहक पेठ या प्रदर्शन विक्री केंद्राचा शुभारंभ

दापोली, दि. १९ (प्रतिनिधी):  दापोली स्थानिक महिला लघुउद्योजिका तसेच काही बचत गटात काम करणाऱ्या महिला यांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर विविध वस्तूंची निर्मिती खाद्यपदार्थ हस्तकला कौशल्यनिर्मिती असलेल्या वस्तू माहिती ग्राहकांना व्हावी. त्यांना थेट या वस्तू महिला उद्योजीकांकडून विकत घेता याव्यात या वस्तूंना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी मानसी बचत गटाच्या अर्चना वाडकर यांनी पुढाकार घेऊन अभिनव संकल्पना आकारास आणून स्वामी ग्राहक पेठ या माध्यमातून प्रदर्शन व विक्री केंद्र सुरू केल आहे.
‘स्वामी ग्राहक पेठ’ हा केवळ स्थानिकच नव्हे तर जिल्हयापासून राज्यापर्यंत ब्रँड व्हावा यासाठी या महिला उद्योजीकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. स्वामी ग्राहक पेठ हा भविष्यात ब्रँड ठरवा यासाठी बचत गटात काम करणाऱ्या अर्चना वाडकर राधिका मोहोड, आदिती मोरे आदी अनेक महिलांनी मिळून हे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘स्वामी ग्राहक पेठ’ या माध्यमातून हे प्रदर्शन व विक्री 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर हे तीन दिवस सकाळी दहा ते रात्री आठ या कालावधीत ही ग्राहक पेठ सुरू आहे. दापोली शहरात राधाकृष्ण मंदिर येथे आयोजित या प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ आमदार योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
महिला व लघु उद्योजकांनी आयोजित केलेल्या स्वामी ग्राहक पेठेत ड्रेस, गोधडी, सोलापुरी चादर, बेडशीट, टॉवेल, ब्लॅकेट, रजई, रुमाल गुलदस्ता, चितळे उत्पादने, पैठणी, रेशीम साड्या, सावंतवाडी लाकडी खेळणी, लाकडी कंदील, गाईचे तूप, लाडू (मेथी, रखा, बेसन, नाचणी), गुलाबजामुन, मोदक, रेडिमेड ब्लाउज, गाऊन, ज्यूट बॅग, साडी कव्हर सेट, इमिटेशन ज्वेलरी, कोकम सरबत, कोकम, पारंपरिक अस्सल मराठी ज्वेलरी, पणत्या, कंदिल, रांगोळी आधी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. एकूण चौदा लघु उ
द्योजक महिलांना या स्वामी ग्राहक पेठेत संधी मिळाली आहे.
या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत अशा स्वरूपाच प्रदर्शन व विक्री यासाठी आवश्यक ते सगळे सह
कार्य केले जाईल व हेच प्रदर्शन व विक्री खेड व मंडणगड येथेही आयोजित कराव यासाठी मी लागेल ते सहकार्य करण्यास तयार आहे असा शब्द यावेळी आयोजकांना देत या लघुउद्योजक महिलांचे कौतुक केल आहे.
या प्रदर्शनात हस्त कौशल्य निर्मिती असलेल्या विविध वस्तू सजावटीच्या आकर्षक वस्तू याचे पॅकिंग कसे असाव इथपासून ते अगदी कोकणातील खाद्यपदार्थांपर्यंतचे स्टॉल ग्राहक पेठेत मांडण्यात आले आहेत. प्रदर्शनाची पाहणी करून प्रत्येक स्टॉलला भेट देत यातील काही वस्तूही श्रेया कदम यांनी आवर्जून विकत घेतल्या. स्वामी ग्राहक पेठ या दापोलीत प्रथमच सुरू पहिल्या दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती या ग्राहकपेटीच्या संकल्पनाकार आयोजिका अर्चना वाडकर यांनी दिली.
आमदार योगेश कदम यांनीही गेल्या पाच वर्षात महिलांच्या आर्थिक रोजगाराच्या सक्षमीकरणासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग असलेले हळद लागवड त्यावर प्रक्रिया उद्योग, उदबत्तीची निर्मिती कारखाना आदी स्वरूपाचे केलेल्या कामाची माहिती यावेळी त्यांनी महिलांबरोबर संवाद साधताना अनौपचारिक गप्पांमध्ये दिली. महिलांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागतामुळे यावेळी श्रेया कदमही भारावून गेल्या
.
राधिका मोहोड यांची आंतरराष्ट्रीय भरारी
विशेष म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या राधिका मोहोड यांचाही राधिका क्रिएशन्स हा स्टॉल या ग्राहक पेठेत आहे. राधिका यांनी शासनाच्या उद्यम या उपक्रमांतर्गत स्कीड्स (SCIDS) ही कंपनी रजिस्ट्रेशन केली आहे. शाश्वत कौशल्य निर्मिती आणि नवोन्मेष विकास Scids ( Skill Creations and innovative Development for Sustainability) हे तत्व उराशी बाळगून या माध्यमातून तब्बल तीनशे महिलांना एकत्र आणले आहे. त्यांच्या कार्याची दखल नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली.आफ्रिकन युनियन डेव्हलपमेंट एजन्सी प्रायोजित दहाव्या कॅलेस्टस जुमा एक्झिक्युटिव्ह डायलॉग (CJUD) कार्यशाळेत KNUST, कुमासी घाना येथे पॅनलिस्ट म्हणून त्यांची भारतातून निवड करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात आफ्रिका येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमात त्यांनी भारतातील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं. कोकणातील व महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी गोधड्यांच्या निर्मितीपासून अगदी कोकणातील उकडीच्या मोदकापर्यंत सगळ्या ऑर्डर्स त्यांनी स्थापन केलेल्या स्कीड्स या कंपनीच्या माध्यमातून पुरवल्या जातात त्यांच्या या मोठ्या कामाची दखल घेत श्रेया कदम यांनी त्यांचे विशेष कौतुक केलं.

आणखी वाचा