चतुरंगच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरीत दोन दिवसांचा स्वर्णसंगीतोत्सव !

‘चतुरंग प्रतिष्ठान’ या लोकमान्य आणि लोकप्रिय संस्थेने यावर्षी अक्षय तृतीयेला ५० व्या वर्षात प्रवेश केला. सलग आणि सातत्यपूर्ण पन्नास वर्षांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि अंशतः सामाजिक अशा आपल्या त्रिक्षेत्रीय वाटचालीचे श्रेय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तीन घटकांना देतात ! त्यातला एक घटक म्हणजे संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणारे नामवंत कलाकार, मान्यवर ! दुसरा घटक म्हणजे  संस्थेत येऊन काम करणारे कार्यकर्ते व त्यांना संस्थेत कामासाठी जायला  अनुमती देणारे त्यांचे कुटुंबघटक-पालक !! आणि तिसरा घटक म्हणजे या दोघांच्या प्रयत्नातून साकारल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना सतत प्रतिसाद, प्रोत्साहन, प्रेरणा, पाठिंबा देणारा रसिक प्रेक्षक श्रोतावर्ग !!! या तिन्ही घटकांमुळेच चतुरंग प्रतिष्ठानने ५० वर्षांच्या वाटचालीत मुंबई – डोंबिवली – पुणे – चिपळूण – रत्नागिरी – गोवा अशा सहा केंद्राद्वारे आणि सुमारे दीडशे कार्यकर्त्यांच्या फौजेसह छोट्या-मोठ्या सुमारे १७५० हून अधिक कार्यक्रमांचा (Events चा) टप्पा पार केला आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या नामवंत मान्यवरांची, कलाकारांची संख्या ९५० हून अधिक असून संस्थेने महाराष्ट्रभरात कार्यक्रम केलेल्या स्थळ- ठिकाणांची संख्या २१० चा आकडा ओलांडून पुढे गेलेली आहे. अर्थात या साऱ्याचे लोभस पसाऱ्याचे श्रेय संस्थेचे नसून, ते मायबाप रसिकांचे असल्याची संस्थेची प्रामाणिक धारणा असल्यामुळे, प्रतिष्ठानने त्या त्या ठिकाणच्या रसिकांना विनम्र वंदन करण्यासाठी आपल्या सहाही केंद्रांवर भव्योदात्त अशा सुवर्णमहोत्सवांचे नियोजन केलेले आहे. त्यातला पहिला कार्यक्रम करण्याचा मान वयाने सर्वात लहान केंद्र असलेल्या आपल्या रत्नागिरी केंद्राला  प्रतिष्ठानने दिला असून, याच महिनाअखेरीस पहिला प्रस्तुत सुवर्णमहोत्सव रत्नागिरीमध्ये साकार होत आहे.
सर्वसाधारणपणे कोकण भागातला प्रेक्षक श्रोतृवर्ग हा संगीतवेडा अधिक असल्याचे लक्षात घेऊन चतुरंगने दोन दिवसांच्या स्वर्णसंगीतोत्सवा ची कार्यक्रम रचना केली आहे. त्यातला पहिला दिवस हा खास नाट्यसंगीतवेड्या रसिकांसाठीचा विशेष दिवस ठरेल ! अर्थात चतुरंगचा हा विचार अतिशय औचित्यपूर्णही आहे असे निश्चितपणे अशासाठी म्हणता येईल की, यंदाचे वर्ष हे स्व. विद्याधर गोखले, स्व. भालचंद्र पेंढारकर आणि स्व.पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे या तीन नाट्यरंगकर्मींचे अतिशय समयोचित असे स्मरण करीत या तीन नामवंत संगीत रंगभूमीकारांची लोकप्रिय अशी नाट्यगीते प्रस्तुत नाट्यसंगीत मैफलीत सादर केली जाणार आहेत. आणि ती सादर करण्यासाठी नीलाक्षी पेंढारकर, ॐकार प्रभूघाटे, प्राजक्ता काकतकर,  विशारद गुरव आणि राजाभाऊ शेंबेकर अशी नामवंत नाट्यसंगीत गायक मंडळी चतुरंगने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांना साथसंगतीसाठी हेरंब जोगळेकर (तबला), हर्षल काटदरे (ऑर्गन), मंगेश चव्हाण (पखवाज) यांची सुरेल साथ लाभणार असून, सुरेख स्वर नियोजनासाठी उदयराज सावंत यांची तांत्रिक जोडही महत्त्वपूर्ण ठरेल आणि हा सगळा संगीत माहोल शब्दबध्द पद्धतीने सजवण्यासाठी कोकणचे सुप्रसिद्ध लोकप्रिय निवेदक श्री. निबंध कानिटकर या कार्यक्रमात मोलाची हजेरी लावणार आहेत.
त्यामध्ये तबला.. पखवाज.. ढोलक.. मृदुंगम्.. हार्मोनियम.. अशा तालवाद्यांचा एकल   आणि एकत्रित असा संगमी नादघोष साकारत, प्रेक्षक-श्रोत्यांना  अनोख्या अशा *नादब्रह्मा* ची अनुभूती देतील सर्वश्री सत्यजित तळवलकर.. प्रताप पाटील.. श्रीधर

पार्थसारथी.. नवीन शर्मा.. आणि अभिषेक शिनकर.. ही सध्याची वाद्य क्षेत्रातील शिखरस्थ वादक मंडळी !!! हा उत्तुंग असा नादाविष्कार या स्वर्णसंगीतोत्सवाला अत्त्युच्च आनंद शिखरावर नेऊन ठेवेल हे सांगायला कोणा संगीत भविष्यवेत्त्याची जरुरी नाही….!
या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा परमोच्चबिंदू असेल प्रतिष्ठानच्या कृतज्ञता सोहळ्यात ! संस्थेची सुवर्णस्पर्शी वर्षांची वाटचाल आणि त्या त्या केंद्राची सुकर, सुविहीत अशी

घडते, साकार होते अशांच्या प्रती, अत्यंत मनोहारी ऋणभावना व्यक्त करणारा कृतज्ञता सोहळा !!! खरं त

र अशा चतुरंगी सोहळ्याचं शब्दात वर्णन करण्यापेक्षा तो ‘याची देही याची डोळा’ स्वानुभवणं हीच त्याची खरी यत्ता असते !त्यामुळे त्याविषयी आता कोणतेच भाष्य न करता एवढेच कळवता येतंय्  की या सोहळ्याचे विशेष असे प्रमुख पाहुणे असतील ख्यातनाम वृत्तसंपादक, पत्रकार, व्याख्याते, लेखक डॉ. उदय निरगुडकर आणि या सोहळ्यात समाविष्ट असतील निवडक रत्नागिरीकर मंडळी…
वाटचाल ही ज्यांच्यामुळे
चतुरंग प्रतिष्ठानचा हा स्वर्णसंगीतोत्सव शनिवार-रविवार दि. २८-२९ ऑक्टोबर २०२३ या दोन दिवशी सायंकाळी ६:०० ते १०:०० या वेळेत जयेश मंगल कार्यालयाच्या प्रशस्त सभागृहात आयोजित केलेला आहे.
हा दोन दिवसांचा इतका भव्य आणि उदात्त सोहळा अगदीच विनामूल्य दिला तर त्याची किंमत वाटत नाही यामुळे अतिशय नाममात्र असे (रुपये १५०, २००/- इतकेच) या पूर्णोत्सवाचे प्रवेशमूल्य असेल. परंतु तो भक्कमपणे सादर व्हावा म्हणून या सोहळ्याचे मुख्य प्रायोजकत्व सांभाळणार आहेत रत्नागिरीतील ख्यातनाम अर्थपेढी ‘स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था’ आणि या महोत्सवाला सौजन्यपूर्ण सहकार्य लाभणार आहे ‘इम्फिगो आय केअर हॉस्पिटल’चे !
या द्विदिवसीय कार्यक्रमाच्या अल्पमूल्यी प्रवेशिका गुरुवार दि.१९ ऑक्टोबर पासून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, खादाडी कट्टा (जोशी पाळंद), श्रीरंग इलेक्ट्रिकल्स (कार्निव्हल शेजारी) या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना उपलब्ध होतील. रत्नागिरीकर रसिकांनी या आनंद सोहळ्यास आवर्जून हजेरी लावावी असे प्रेमापूर्वक आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

आणखी वाचा