चिपळूण, दि. २३ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रशांत यादव यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एबी फाँर्म दिला आहे. उद्या गुरूवार दि. २४ ऑक्टोबर रोजी प्रशांत यादव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
चिपळूण-संगमेश्वर मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रशांत यादव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
चिपळूण विधानसभा मतदारसंघात महायुती तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार शेखर निकम यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटे की टक्कर लढत होणार आहे.









