काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागा लढवणार : अविनाश लाड

रत्नागिरी, दि. २३ (प्रतिनिधी): महाविकास आघाडीत जागा वाटप झाले नसले तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा सोडणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून एक तरी जागा मिळाली पाहिजे असा जो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत ऐकायला येत आहे. म्हणूनच काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागा लढवणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी स्पष्ट केले. लांजा राजापूर मतदारसंघातून आपण स्वतः इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा