उदय बनेंनी काम थांबवलं, राजकारणातून निवृत्ती?

रत्नागिरी, दि. ०५ (प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत या सगळ्यात अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटातील शिलेदार उदय बने यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेत पक्षाचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांची मंगळवारी सात नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे जाहीर सभा होणार आहे या सभेच्या पूर्वसंध्येला मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला हा मोठा धक्का मिळाला आहे. उदय बने यांनी पक्षाचे काम थांबवण्याचा घेतलेला निर्णय हा मोठा राजकीय भूकंप मानला जात आहे.
आपण निवडणुकीसाठी कधीही इच्छुक नव्हतो मात्र अवघ्या कार्यकारिणीने माझ्या नावाची शिफारस केली म्हणून मी तयार झालो मात्र ही शिफारस उद्धवजींनी मला सांगितलं की माझ्यापर्यंत आलेली नाही त्यांनी विनायक राऊत यांनाही विचारलं ही शिफारस माझ्याकडे का नाही आली अशी ही मार्मिक टिप्पणी उदय बने यांनी विनायक राऊत यांच्यासंदर्भात केली. पण आता बास झालं मी अडीच वर्षे वाट पाहिली आता मी दमलो आहे माझं ऑपरेशन झालं त्यातूनही मी उभा राहिलो आणि पक्षाचं काम करत होतो मात्र आता मी थांबणार आहे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे मानणारा मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्याबरोबर काम केलेलं मी शिवसैनिक आहे अशीही बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ठाकरे गटाचे निष्ठावान समजले जाणारे ज्येष्ठ शिवसैनिक उदय बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताना पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत आपण एक निषेध म्हणून हा उमेदवारी अर्ज भरला होता. आपण तब्बल 45 वर्षे काम केल्यानंतर आता पक्षाचं काम थांबण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या नावाची शिफारस अख्या कार्यकारिणीने केली होती हे शिफारस पत्रच त्यांनी माध्यमांसमोर दाखवत आज उघड केलं.
दोन उदय एकत्र आले तर….
शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की दोन उदय एकत्र आले तर आम्ही अधिक चांगल्या जोमाने काम करू शकतो असे सूचक विधान त्यांनी केलं होतं. यावर बोलताना उदय बरे म्हणाले की मी त्यांच्याही भूमिकेचे स्वागत करतो आता जो कोणी चांगलं काम करेल त्याला माझा पाठिंबा असेल मला आता माझ्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मला समाजकारण करायचं आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून समाजकारण हे माझे ध्येय आहे.
आता मला पक्ष कोणती जबाबदारी देणार नाही मी गेली अडीच वर्षे वाट पाहिली आणि आता दिली तरी मी काम करणारही नाही मी आता दमलो आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रत्नागिरी येथील विविध जिल्हा परिषद गटातून तब्बल पाच वेळा निवडून आलेले व तब्बल तीन वेळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होळीचे ऐतिहासिक कामगिरी नाव असलेले व विषय समित्यांचे सभापती म्हणून काम केलेले उदय बने यांनी पक्षाचे काम थांबवण्याचा मोठा निर्णय घेतल्याने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

 

फोटो सौजन्य : Ratnagiri 24 News – Youtube चॅनेल 

आणखी वाचा