“मी बेइमानी करणार नाही,. मी गुवाहाटिला जाणार नाही…” रत्नागिरीचे उमेदवार माजी आमदार बाळ माने यांचे घणाघाती भाषण

रत्नागिरी, दि. ०५ (प्रतिनिधी): उबाठा गटाचे रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांची सभा रत्नागिरी त होतं आहे. यावेळी बोलताना बाळ माने म्हणाले की, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मशाल निशाणी वरती मी आज आशीर्वाद मागण्यासाठी उभा आहे. मला आठवण येते. १९९० सालामध्ये राज्यात एक वेगळा विचार दिला आणि तो विचार घेऊन शिवसेना प्रमुखांचा विचार रुजविण्याचा मी प्रयत्न आज पर्यंत केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांचे विचार मी पोचविण्याचे मी प्रयत्न केले. हे वैभवाचे दिवस होते. १९९५ साली मी सामान्य कार्यकर्ता होतो. रवींद्र माने साहेबांनी शिवसेना रुजवली. या ३५ वर्षातली पाच वर्षे सोडली तर आम्ही हातामध्ये हात घालून आम्ही काम केले. ज्यावेळी तुम्ही माझ्या हातामध्ये शिवबंधन बांधले तेव्हा मला सगळ्यांची आठवण आली. आज मला खऱ्या अर्थाने मी नतमस्तक झालो. गेल्या वीस वर्षात काय झाले ते रत्नागिरीच्या जनतेला माहिती आहे.
“सर्व रत्नागिरीच्या जनतेने मला विश्वास दिलाय. त्यामुळे तुमचे उपकार मी विसरणार नाही. १९९९ साली गीते साहेब एका दिवशी आमदार आणि खासदार झालो.
२०१४ साली मला विचारले होते. त्यावेळी मी सांगितले मला विधानसभा लढवायची आहे. दुर्दैवाने काय झाले ते सगळ्यांना माहिती आहे. अन्यायाची गाय देवाने राखलेली आहे.
मतदारांना मी सांगेन शिवसेना प्रमुखांचे विचार मी गावागावात पोचणार आहे. या गद्दार आणि बेइमानांच्या विरोधात ही सगळी रत्नागिरी एकत्र झाली आहे. शेतकरी मासेमारीचे प्रश्न दुर्दैवाने रत्नागिरीत हे प्रश्न सुटले नाहीत. रत्नागिरीत स्टेडियमची वाट लावून झाले. किती तरी प्रकल्प पूर्ण आपल्याला करायचे आहेत.
मेडिकल कॉलेज मध्ये प्राध्यापक नाही. इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्राध्यापक नाही. सिव्हील हॉस्पिटल मध्ये औषधोपचार होत नाही. या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था नाही. कितीतरी प्रश्न प्रलंबित प्रश्न आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न मी सोडविणार आहे.
जुलमी रीतीने दबाव टाकून प्रशासन चालवले जात आहे. त्यामुळे मी विश्वास देतो की तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी बे इमानी करणार नाही. गुवाहाटी मध्ये जाणार नाही. हे आज दरवाजे चाटत आहेत. जनाची नाही तर मनाची लाज बाळगत असाल तर उंबरठे झिजवू नका. जनतेचे ठरले आहे. ते आम्हाला आशीर्वाद देणार आहेत.

आणखी वाचा