दापोली, दि. ०७ (प्रतिनिधी): सागरपुत्र प्रतिष्ठान पाजपंढरी तर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्त नमन नटवरा ” हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. दापोली तालुक्यात पाजपंढरी येथे रंगदेवतेला नमन करणारा हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष पांडुरंग वाघे, सत्कारमूर्ती- श्रीमती वैशाली(माई) पाटील, बाळकृष्ण वाघे, ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर वाघे, काशिनाथ पावसे, सागरपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण चोगले, दिगंबर पावसे अनंत चोगले, सुरेश चोगले, लक्ष्मण चोगले, महेश तबीब, दत्ताराम पावसे, अनंत पाटील , शैलेंद्र कालेकर , लेखक-कवी बाबू घाडीगावकर सर, चेतन राणे, नरेश चोगले, संगीता चोगले , अमित पाटील उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ रंगकर्मीं पार्श्वगायिका श्रीमती माई जनार्दन पाटील, ज्येष्ठ रंगकर्मीं बाळकृष्ण वाघे या रंगकर्मीना मान्यवरांच्या हस्ते “कला गौरव पुरस्कार 2024” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नाट्यक्षेत्रात त्यांच असलेले योगदान त्यांचा अनुभव त्यांनी आजवर घडवलेले अनेक कलाकार हे त्यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.








