लांजा, दि. १२ (प्रतिनिधी): कोकणचे पारसमनी अभिनेता – प्रभाकर मोरे यांच्या हस्ते ‘ गावं जावडे- बापेरे – रावारी लांज्याची शान हाय र…’ या गाण्याचा पोस्टर लॉन्च झाला आणि “कोकण टॉकीज” या यु-ट्यूब चॅनल वर अभिमान गीत प्रदर्शित झालं आहे .तसेच या गाण्याच्या पोस्टर लॉन्च साठी अनेक कलाकार उपस्थित होते.या गाण्यात अभिनेता – किशोर साळुंखे आणि अभिनेता – मी कोकणी निखिल सकपाळ सोबत अभिनेत्री – सिद्धी सांडये आणि वैष्णवी सुर्वे यांच्या सोबत जावडे – बापेरे – रावारी या तिन्ही गावातील कलाकार सुध्दा सहभागी होते. या गाण्याचे दिग्दर्शन – सुयोग हांदे यांनी केलं आहे आणि चित्रीकरण – देव सावंत आणि ड्रोन कॅमरा – सुपर सुबोध , नृत्य दिग्दर्शन – रुपेश गोरवे यांनी केलं आहे.
या गाण्याचे संगीत – पंकज काताळे आणि पंकज घाणेकर यांनी केले असून कोकणची परंपरा जपणारे शाहीर – राजेश निकम आणि शाहीर – देवेंद्र झिमन , गायिका – रसिका तांबे यांच्या सुमधुर आवाजात गाणं गायलं गेलं आहे .तसेच जावडे , रावारी , बापेरे या गावांच्या ग्रामीण व मुंबईच्या ग्रामस्थांनी या गाण्याला विशेष सहकार्य केलं आहे आणि कलारंग प्रोडक्शनचे सहकार्य लाभले आहे.
या गाण्याच्या संकल्पने विषयी गाण्याचे प्रमुख किशोर साळुंखे यांनी सांगितले की हल्ली अनेकजण आपापल्या गावावर गाणे काढतात आपण पण आपल्या गावावरती गाणं तयार करू तशी गेल्या २ वर्षा पासून गावातील मुलांची इच्छा होती की आपल्या गावावरती गाणं आलं पाहिजे. मी माझ्या कामात असल्याने लक्ष दिले नव्हते परंतु तिन्ही गावातील तरुण मंडळींनी गाण्यासाठी सतत पाठपुरावा केला गावातील निसर्ग सौंदर्य, परंपरा, जनजीवन जगासमोर यायला हवे या गाण्याच्या चित्रीकरणावेळी त्यांनी मला सर्व प्रकारचे सहकार्य केले आणि गाणं बनवलं गेलं हे अभिमान गीत तीन गावांचे मिळून केलं गेलं आहे, गाणे करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे माझं गावचं घर जावडे- बापेरे- रावारी या तिन्ही गावांच्या सीमेवर आहे म्हणूनच माझ्या साठी ही तिन्ही गावं म्हणजे एकच गाव असल्याचे श्री साळुंखे यांनी पुढे सांगितले.