आगरवायंगणी हायस्कूल दापोलीचा वार्षिक क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न

पालगड, दि. ०९ (प्रतिनिधी): दापोली तालुक्यातील बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी या प्रशालेचा शाळेतील क्रीडांगणावर दोन दिवसीय वार्षिक क्रिडा महोत्सव उत्साहात पार पडला.

या क्रिडामहोत्सवासाठी आगरवायंगणीचे संस्था सचिव संतोष आंबेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून क्रिडागंणाचे उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल, कबड्डी, लंगडी क्रिकेट या सांघिक खेळांचा समावेश होता . इ.८ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांनी आपले खेळातील कौशल्य दाखवत मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.

प्रशाळेचे मुख्याध्यापक आकाराम महिंद यांनी शालेय जीवनातील खेळाचे महत्व सांगितले. तसेच संस्था सचिव आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत खेळाचे महत्त्व समजावून खेळामध्ये शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावर उंचवावे. याबद्दल मार्गदर्शन केले. हा क्रिडा सोहळा पार पाडण्यासाठी क्रिडा शिक्षिका जयश्री रिंगणे, क्रिडा शिक्षक सत्यवान दळवी, शैलेश वैद्य तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून स्पर्धा अतिशय आनंदी वातावरणात पार पडल्या.

प्रशालेचे मुख्याध्यापक आकाराम महिंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्विरित्या पार पडला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक यांचे सहकार्य लाभले.

आणखी वाचा