वेळंब विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चा शुभारंभ

चिपळूण, दि. ०९ (प्रतिनिधी): तालुक्यातील  वेळंब  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्राचा सोमवारी ८ जानेवारी रोजी शुभारंभ करण्यात आला.चिपळूणचे सहाय्यक निबंधक सुशांत घोलप यांच्या हस्ते फित कापून वेळंब  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी कुमार देवरुखकर, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अधिकारी महेश रजपूत,वेळंब  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माजी जि.प सदस्य प्रवीण ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. ही संस्था वेळंब,जामसुत,पांगारी, गोणवली,पोमेंडी अशा पाच गावांची असून सभासद संख्या २३५० इतकी आहे.

संस्थेची प्रगती होण्यासाठी सर्व संचालक मंडळ खूप मेहनत घेत आहेत.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजना सभासदांना पर्यंत पोहचवून त्या त्या वेळी त्यांना लाभ मिळून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात अशी माहिती वेळंब  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रवीण ओक यांनी दिली,संस्थेचे इतिवृत्त वाचून ,कारभार विषयी माहिती, संस्थेचा इतिहास या बद्दल ओक यांनी उपस्थित मंडळीना परिपूर्ण अशी माहिती दिली.जामसुद गावचे सरपंच शेलेश साळवी, वेळंब गावचे सरपंच समीक्षा बार्गोडे,पोमेंडी गावचे सरपंच श्रुती थरवळ,पांगरी गावचे सरपंच विष्णू विर, वेळंब गावचे पोलीस पाटील स्वप्नील बार्गोडे,घाडेवाडी पोलीस पाटील अनिल घाडे,उद्योजक बाळकृष्ण ओक,जगन्नाथ बागकर,माजी संचालक धोंडू राऊत,वसंत देवधर ,दत्तात्रय वेल्हाळ,माजी पोलीस पाटील मदन साळुंखे यांच्यासह या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.संजय पवार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर मिलिंद मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आणखी वाचा