दापोली, दि. १३ (प्रतिनिधी)

: सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीने इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत उत्तम यश संपादन केले. ही परीक्षा 2023 च्या डिसेंम्बर महिन्यात आयोजित केली गेली होती.
सिल्व्हरझोन ऑलिम्पियाड दिल्ली आयोजित इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीच्या 08 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यातील कु. महमूद महालदार इयत्ता पहिली , कु. क्षितिज नार्वेकर इयत्ता दुसरी, कु. रिद्धी बांगर इयत्ता चौथी, कु.आराध्य मेहता इयत्ता सहावी व कु. अद्वैत अमृते इयत्ता सातवी अशा ५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले.
शिवाय, कु. अली रखांगे यांना रौप्य, व कु. रित्विक हेदुकर विद्यार्थ्यांना कांस्य पदक मिळवले. कु.स्वरा मेहता या विद्यार्थिनीला सहभाग प्रमाणपत्र मिळाले असून सगळ्याच विद्यार्थ्यांनी

घवघवीत यश मिळविले आहे.
जागतिक स्तरावर या परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे यातील यशाला विशेष महत्त्व आहे. संस्थेचे व शाळेचे अध्यक्ष सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता व संपू

र्ण शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांचे

अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.








