शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे सत्कार

रत्नागिरी, दि. १५ : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातून एकमेव शिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार यांचा सत्कार करण्यात आला.

दिनांक १५ जून २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी शाखेतर्फे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोहार यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याचा सन्मान आणि अभिमान उंचावल्याची भावना व्यक्त केली.

शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर झळकले असून, त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने शिक्षकवर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

आणखी वाचा