कार्यक्रम आणि गुणगौरव सोहळा पार पडला. “मिश्र डाळींपासून एक पदार्थ तयार करा” या विषयावर आयोजित पाककला स्पर्धेत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. परीक्षक म्हणून श्रीम. तेरेदेसाई यांनी काम पाहिले. त्यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला, तरुण-तरुणी, अंगणवाडीतील मुले-मुली यांनी नृत्य, गीते आणि नाटिकांद्वारे रंगत आणली. १० वी व १२ वी मध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला.