उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू..

बारामती, दि. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आहे. या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीएनं स्पष्ट केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अजित पवार हे संबोधित करणार होते. मात्र लँडिंग करताना त्यांच्या विमानाला अपघात झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांना घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचाय समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला. तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.

हे छोटेखानी विमान लँडिंगदरम्यान विमान कोसळलं. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA ने दिली आहे. लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी धूराचे मोठे लोट आले. तर विमानाला मोठी आग लागली. त्यात हे विमान जळून खाक झाले. या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला.बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले. विमानाला भीषण आग लागली. आज अजितदादांच्या चार सभा होत्या. त्यासाठी ते येत होते. दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले. त्यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. यंत्रणा ही धावल्या. पण अपघात अत्यंत भीषण होता. मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते. या विमान अपघाताने पवार कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. तर राज्यालाही मोठा धक्का बसला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली. याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. एक दिलखुलास, रोखठोक नेता या विमान अपघाताने हिरवला आहे. त्यांची प्रशासनावर मोठी पकड होती. या आठवणी आता कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करतील.

विमानाला लँडिंगदरम्यान अपघात : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत येत असताना त्यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर विमानाला आग लागल्याचंही वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत येत होते. काल कॅबिनेट बैठक आटोपल्यानंतर आज सकाळी ते विमानानं बारामतीकडं रवाना झाले होते. याच वेळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना हा अपघात झाला. या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षकही उपस्थित होते. अपघाताची माहिती मिळताच बारामती अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पवार कुटुंबीयांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

अपघातस्थळी आढळले तीन मृतदेह : “बारामतीत लँडींग करताना विमानाचा अपघातात झाला आहे. या अपघातात विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. या विमान अपघातातील घटनास्थळावर तीन मृतदेह आढळून आले आहेत. मात्र मृतदेहाची अद्यापही ओळख पटली नाही. हे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती पुण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप सिंह गील यांनी दिली.

अजित पवार यांच्या आज 4 नियोजित सभा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज बारामती जिल्ह्यात चार नियोजित सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी अजित पवार हे सकाळीच मुंबईवरुन बारामतीकडं निघाले होते. मात्र सकाळी 08.45 वाजता लँडींग करताना त्यांच्या विमानाला अपघातात झाला.

आणखी वाचा