लांजा, दि. ०८ (प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच संभाव्य उमेदवार आपापल्यापरीने उमेदवारी मिळविण्यासाठी मोर्चा बांधणी करत आहेत. तरी उमेदवार मतदार संघामध्ये विविध कार्यक्रम व गाठीभेटी यावर जोर देत आहेत.
त्यामध्ये राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण आपापल्यापरीने प्रयत्न करती आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा उदय सामंत यांचे बंधू व सिंध्दूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे आपणच उमेदवार असणार आहे हे गृहीत धरून काम करत आहेत.
परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवून सर्व उमेदवारांना धक्का दिला अशी चर्चा सुरू आहे. त्यांनी अजितदादा पवार यांचा फोटो ठेवून तूच असे कॅपशन दिली आहे.
त्यामुळे अजित यशवंतराव यांनाच महायुतीकडून उमेदवारी मिळणार असे बोलले जात आहे. त्यामुळे आता राजापूर विधानसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार व कोण कोणत्या पक्षाकडून तसेच अपक्ष निवडणूक लढवणार हे पुढील काळाच ठरविण्यात येईल