अनंत गीते यांच्या विजयासाठी युवा सैनिकांचे ठाकरे घराण्याचे कुलदैवत कोंडजाई देवीला साकडे

पाली /बेणसे दि. २१ (धम्मशील सावंत) : उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व युवासेनेच्या वतीने माजी खासदार अनंत गीते यांना रायगड लोकसभेची उमेदवारी दिली आहे. गितेंना निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  कंबर कसली आहे. सुधागड तालुक्यातील युवासेनेच्या वतीने नागशेत येथील ठाकरे घराण्याची कुलदैवत असलेल्या कोंडजाई देवीला नारळ वाढविण्यात आले.
युवासेना माजी जिल्हाप्रमुख सचिन डोबले, युवासेना उपजिल्हा अधिकारी प्रवीण पाटील, विधानसभा अधिकारी किरण पिंपळे, युवा सेना सुधागड तालुकाप्रमुख नंदेश पालांडे यांनी तसेच उपस्थित युवा सैनिकांना कोंडजाई देवीकडे साकडे घातले व मनोभावे देवीचे दर्शन घेतले. तसेच अनंत गीते भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर त्यांच्या हस्ते देवीची खणानारळाने ओटी भरू व या विभागाचा आणि या देवस्थानाचा विकास करू असे बोलून कोंडजाई देवीचा जयजयकार केला.
तसेच अनंत गीते यांच्या प्रचारार्थ युवा-संपर्क अभियान गाव भेटी कार्यक्रम सुधागड तालुक्यात देखील राबविण्यात येत आहे. याप्रसंगी युवासेना नांदगाव विभाग अधिकारी पदी मयूर सुहास जाधव, उपविभाग अधिकारी पदी नितेश कैलास कोळी, पिंपळोली शाखा अधिकारी पदी संगम कैलास कोळी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख सोहम खोडागळे, युवासेना शहर अधिकारी यश हजारे,  शहर सरचिटणीस विनीत शिरसागर, मनोज शिंदे आदींसह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा