अंधेरीच्या तहसीलदारांनी केला घरकामगारांच्या मुलांचा गौरव

मुंबई, दि. ०४ (क्षितिज कदम): आजची मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. अशा परिस्थितीत मुलांनी चांगला अभ्यास करून पुढे जावे, असे प्रतिपादन अंधेरीच्या तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या सत्कार समारंभात केले. हम एकता वेल्फेअर शेजार समिती सहकारी संस्थेचे अध्यक्ष बबन्ना कुशलकर यांच्या वतीने 75 टक्के वरील विद्यार्थांसाठी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. अंधेरी गिल्बर्ट हिल येथील समाजकल्याण केंद्र येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 135 बालकांचा गौरव करण्यात आला.

या वेळी गुन्हे शाखेचे विजय धोत्रे, यागिनी परमार, वसीमा काझी, अरुणा वाघ, स्वाती दामापूरकर, संजय यादव, लक्ष्मी महाडिक, राजू धोत्रे, चंदू वडर, प्रकाश देवदास आदींनी मुलांना पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ( उबाठा ) अनेक पदाधिकारी उपस्थित होते, संघटनेचे अध्यक्ष बबन्ना कुशलकर म्हणाले की, जगाची प्रथा आहे की ज्येष्ठांना प्राधान्य दिले जाते, त्यांच्यासाठी अनेक दरवाजे खुले आहेत. तर घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या होतकरू मुलांचाही सन्मान केला पाहिजे, जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल.

आणखी वाचा