बापासाठी लेक मैदानात : किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यासाठी अपूर्वा सामंतचा जोरदार प्रचार

रत्नागिरी, दि. २५ (विशेष प्रतिनिधी): विधानसभा निवडणुका तोंडावर आले असून कोकणात राजकीय वातावरण तापले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात बैठका भेटीगाठी अनेक कार्यक्रम तसेच पक्षप्रवेशाचा धुमधडाका मंत्री उदय सामंत यांचे जेष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सुरू केला आहे. गेले कित्येक महिने या मतदार संघात किरण सामंत यांनी येथील काही प्रश्न समस्या थेट शासकीय पातळीवरून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. गेले कित्येक महिने या परिसरातील सातत्याने संपर्क ठेवून आहेत.  त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या सुकन्या अपूर्वा सामंत यांनीही मोठी साथ दिली असून आपल्या वडिलांसाठी गेले काही महिने भैय्या सामंत  यांच्या सुकन्या अपूर्वा याही मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर कोणी नटसम्राट असतो कार्यसम्राट असतो पण या मतदारसंघातील कार्यसम्राट म्हणून माझ्या वडिलांच्या पाठीशी येथील जनतेने , माझ्यासारख्या युवावर्गानं कोणत्या क्षणी तुमच्यासाठी धावणारे भैय्या यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं असेही मोठे आवाहन करत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण उर्फ भैय्या सामंत हेच या निवडणुकीत उमेदवार असतील असेही स्पष्ट संकेत अपूर्वा सामंत यांनी दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अपूर्वा सामंत यांनी अनेक गोष्टींचा उलगडा करत आपली जाहीर मत व्यक्त करत भूमिका मांडली आहे. किरण सामंत व उदय सामंत हे आमच्या कुटुंबाचे दोन डोळे असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही भावांमध्ये कोणतेही मतभेद कधीच झाले नव्हते असेही स्पष्ट केल आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांच्या सुकन्या अपूर्वा सामंत याही आपले वडील भैया सामंत यांच्याबरोबर या मतदारसंघात सक्रिय असल्याचे चित्र या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघावर भाजपाकडूनही दावा करण्यात आल्याने अवघ्या कोकणाचे लक्ष या ठिकाणी लागून राहिल आहे.
हा भाग डोंगराळ असून रोजगाराच्या फार मोठ्या  कोकणात संधी याच ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु सध्या अनेक वाड्यावर येथील घरे  बंद पडली असून मुंबई पुण्याकडे युवावर्ग रोगासाठी स्थलांतरित होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. युवा वर्गाला आपण शेतकरी आहोत हे सांगायला लाज वाटते कारण त्यांनाही भीती असते की आपलं लग्न ठरणार नाही त्यामुळे या मतदारसंघात मला तो मान त्यांना मिळवून द्यायचा आहे जोपर्यंत ॲग्रो इंडस्ट्रीज या परिसरात येत नाहीत तोपर्यंत मी गप्प बसणार नाही ॲग्रो इंडस्ट्रीजला विविध सबसिडी आहेत मात्र या योजना या ठिकाणी राबवले जात नाहीत अशीही खंत अपूर्वा सामंत यांनी व्यक्त केले असून यासाठी आपण या मतदारसंघात काम करत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. आमचा कोकणातला शेतकरी कधीही आंदोलन करत नाही कधीही सरकारला ब्लॅकमेल करत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांना काही मिळालं नाही पाहिजे

त्यांचाही तो हक्क आहे  शेतकरी म्हणून अशी भूमिका अपूर्वा सामंत यांनी मांडली आहे. इतकच नाही तर यासाठी माझे वडील किरण सामंत व पालकमंत्री उद्योग मंत्री म्हणून माझे काका उदय सामंत त्यांच्याकडे माझी मागणी आहे की एमआयडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी ऍग्रो इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत येथील लोकांना जनतेला जे वाटतं ते उद्योग या ठिकाणी आले पाहिजेत अशीही रोखठोक भूमिका अपूर्वा सामंत यांनी घेतली आहे.
या परिसराला निसर्गाने भरभरून दिल आहे  समुद्रकिनारा लाभला आहे पर्यटन व त्यावर आधारित उद्योग व्यवसाय या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत वॉटर स्पोर्ट्स, हॉटेल इंडस्ट्री असे अनेक व्यवसाय या ठिकाणी होऊ शकतात येथील लोकांना जे वाटतं तेच उद्योग या परिसरात यायला हवेत अशी ही स्पष्ट भूमिका मांडत आणि या सगळ्यासाठी किरण सामंत हेच या भागातील आशेचा किरण आहेत आणि जेव्हा हे घडेल त्याचवेळी किरणोदय होईल. असे सांगत विरोध केलेल्या गोष्टींना आपण साथ देऊ शकत नाही कोणाला काहीतरी हवं आहे म्हणून नाही तर येथील स्थानिकांच्या शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत हेच उद्योग या ठिकाणी व्हायला हवेत आणि तसं झालं पाहिजे आणि यासाठीच आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो असं सांगत पर्यावरण पूरक प्रकल्पांची साथ देणार असल्याचेही त्यांनी सुचित केल आहे.
गेले पंधरा वर्षे या परिसरात विद्यमान आमदार राजन साळवी काम करत आहेत त्यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की मी त्यांच्या इतकी मोठी नाही आणि स्वतःला तसं समजतही नाही त्यांनी आमदार फंडातून या ठिकाणी काम केली आहेत. मात्र डोंगरी विकास व जन सुविधा हेच दोन हेड एखाद्याला माहिती असतील तर किती विकास होऊ शकतो असाही सवाल थेट अपूर्वा सामंत यांनी उपस्थित केला आहे.  खार लँड या हेड खाली निधी या ठिकाणी आजवर वापरला गेला नाही तो परत गेला आहे. शासनाच्या विविध प्रकल्प योजना येथे असायला हव्यात. या परिसरात एक मोठे स्पेशलिटी हॉस्पिटल नाही आहे रत्नागिरी व कोल्हापूर शिवाय येथील लोकांना पर्याय नसतो मात्र या सरकारच्या माध्यमातून याच ठिकाणी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मंजूर झाले असुन पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. 2021 साली हे हॉस्पिटल रद्द झालेलं होते. कोणी शिफारस दिली म्हणजे ते काम झालं असं होत नाही सातत्याने पाठपुरावा करावा लागतो अशा शब्दात हॉस्पिटल मंजुरीबाबत अपूर्वा सामंत यांनी अप्रत्यक्षरीत्या आमदार राजन साळवी यांना सुनावले आहे.
कोकणातील युवकांच्या कलाकारांचा शाश्वत विकास हा झाला पाहिजे हीच माझी किरण सामंत यांची  सुकन्या म्हणून नाही तर कोकणातील नागरिक मतदार म्हणून माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
2029 साली अपूर्वा निवडणुकीच्या रिंगणात?
आणखी पाच वर्षाने 2029 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अपूर्वा सामंत या आमदार म्हणून विधिमंडळात जाणार का? या विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की मी सामंत यांची सुकन्या म्हणून नाही मला वारसा म्हणून काहीच नको आहे मात्र येथील जनतेच्या मनात असेल तर ते नक्कीच घडेल. आणि यासाठी म्हणून नाही पण किरण सामंत यांची मुलगी म्हणून मला गेले 25 वर्षे त्यांचा अभिमान आहे तसाच अभिमान अपूर्वा सामंत हिचे वडील म्हणून किरण सामंत यांनाही वाटेल असं काम मला करायचं आहे,  आणी यासाठी मी जनतेची काम करून रक्ताचे पाणी करेल असं सांगत आणखी पाच वर्षांनी आपण आमदारकीच्या स्पर्धेत नक्कीच असू असे त्यांनी थेट सूचित केल आहे.

आणखी वाचा