…अखेर पोलिसांनीच काढला काटा ; बदलापूर बलात्कार आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू

स्वरक्षणासाठी पोलिसांनी झाडल्या गोळ्या
मुंबई, दि. २३ ( विशेष प्रतिनिधी): बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. त्याला ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असतानाही घटना घाडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे.
तळोजा जेलमध्ये बदलापूर पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूर पोलीस आरोपीचा ताबा घेत होते. ताबा घेत असताना आरोपी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली. बंदूक हिसकावताच त्याने बंदुकीतून तीन राऊंड फायर केले. आरोपीने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळी झाडली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
कोण आहे नराधम अक्षय शिंदे?
अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे
अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत
अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई
या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता
एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला
अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब
अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या
अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील
मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात
आरोपीनं दिली होती गुन्ह्याची कबुली
विशेष तपास पथकाने (एसआयटी) बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. शाळेचे कर्मचारी, डॉक्टर, फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह 20 पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षीचा सहभाग असून आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते.प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आरोपीने या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत, तसेच डॉक्टरांसमोरही मान्य केले होते. डॉक्टरांसमोर आरोपीने दिलेली माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे अधिकान्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यातील 183 तरतुदीनुसार दोन्ही यालिकांचा जयाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओळखपरेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनी ओळखले आहे.
गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला?  ‘बदलापूर’मधील सूत्रधार कधीही समोर येणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण
अक्षय शिंदे याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली. अक्षय शिंदेंने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला असा सवाल त्यांनी विचारला.
संस्थाचालकांना वाचवण्याचा प्रयत्न?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज जी गोष्ट झाली त्यावरून राज्यातमध्ये काही कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतोय. अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही.बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते. गृहमंत्र्यांचे काही वचक आहे की नाही? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
महाराष्ट्राची बदनामी सुरू
गृहमंत्र्यांना ताबडतोब काढून टाकलं पाहिजे, कधी नव्हे ती महाराष्ट्राची बदनामी होत आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की, या एन्काऊंटरमुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. राज्यातली पोलिस यंत्रणा इतकी कूचकामी झाली आहे का? काय चाललंय का महाराष्ट्रात?पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेसोबत अजून कोण आरोपी होतं, या गोष्टीच्या तळापर्यंत जाणं गरजेचं होतं. सत्य बाहेर येऊन खऱ्या दोषीला शिक्षा व्हायला हवी होती. आता त्याचा एन्काऊंटर झाल्यामुळे हे कधीही समोर येणार नाही. आरोपीला मारण्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे हे तपासलं पाहिजे.

आणखी वाचा