चिपळूण, दि. ०९ (प्रतिनिधी): विद्यार्थी वर्गाने भविष्याचा वेध घेत आपली आवड, आपली अभ्यासाची प्रगती हे डोळ्यासमोर ठेऊन १० वी नंतर अभ्यासक्रम निवडावा. खास मित्र किंवा मैत्रीण ज्या महाविद्यालय मध्ये प्रवेश घेते तिथे प्रवेश घेण्यापेक्षा सर्व बाजूने विचार करून अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे असे केल्यास नंतर त्रास होत नाही असा सल्ला डी.बी.जे. महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्य सौ. लीला बिरादार यांनी दिला.