ऐन गणेशोत्सवात चिपळूण हादरले : चिपळूण बहादुरशेख नाका येथे युवकाचा खून झाल्याचा संशय, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

चिपळूण, दि. ०८ (प्रतिनिधी): ऐन गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर हादरला आहे चिपळूण बहादूर शेक नाका येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे युवकाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने हे चिपळूण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. हमीद शेख असे या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती असून हा सगळा हादरवून टाकणारा प्रकार सकाळी काही वेळापूर्वी उघडकीस आला आहे.

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका या गजबजलेल्या भागात या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने चिपळूण हादरले आहे. त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ऐन गणेशोत्सवच्या आनंदाच्या काळात चिपळूण शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

दरम्यान चिपळूण मध्यवर्ती ठिकाणी बहादूरशेख नाका येथे येथील खुनाचा छडा अवघ्या काही तासात लावण्यात चिपळूण पोलिसांना मोठे यश आल आहे. खून करणाऱ्या दोन युवकांना चिपळूण पोलिसांनी ही घटना समजल्यानंतर अवघ्या काही तासातच ताब्यात घेतल आहे.चिपळूण येथील वडार कॉलनी परिसरात राहणाऱ्या या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या दोघांना या खून प्रकरणी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आल आहे. निलेश आनंद जाधव व अन्य एका संशोध आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यातील एक अन्य संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याचा अंदाज असून याची खात्री पोलीस प्रशासन करत आहे. चिपळूण शहरामध्ये खून झाल्याची घटना घडतात या सगळ्याची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रशासनानेही घेतली होती. चिपळूण पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तर काही संशयित व्यक्तींनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं

दरम्यान ज्या युवकाचा खून करण्यात आला आहे तो चिपळूण कावीळतळी परिसरात आपल्या मावशीकडे वास्तव्यास होता तो मूळचा कराड येथील आहे. त्याची आई कुवेत येथे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे या सगळ्याचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत. हा खून नेमका कोणता कारणातून झाला याचा सविस्तर तपशील समजला नसला तरीही शिवीगाळ प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आणखी वाचा