शरद पवारांच्या सभेच्या पूर्वसंध्येला चिपळूणात भव्य रॅली

चिपळूण, दि. २२ (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचे मतदारसंघातील वर्चस्व ताकदीचे प्रदर्शन आणि शह-काटशह राजकारण सुरु झाले आहे. याच राजकारणाचा एक भाग असलेली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार, प्रशांत यादव यांच्या आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या चिपळूण सभेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चिपळूण शहर, बाजारपेठ-खेर्डी आदी परिसरात ही रॅली काढण्यात आली. पक्षाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह असलेले झेंडे लावून शेकडो दुचाकी, रिक्षा, चारचाकी शेकडो चालक महिला- पुरुष, पक्षाच्या आणि प्रशांत यादव यांच्या नावाच्या घोषणा देत रॅलीत सहभागी झाले होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांच्या पाठबळामुळेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नव्या प्रशांत पर्वाला सुरुवात होत आहे . प्रशांत यादव आमदार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते पूर्ण ताकतीनिशी कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी यांच्यासह सर्वच पक्षातून यादव यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रशांत यादव यांनी आपल्या झंजावती दौऱ्यातून चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ चांगलाच पिंजकून काढला आहे. आपण स्वतः विधानसभेचा उमेदवार असल्याचे मानून यादव यांचे प्रत्येक कार्यकर्ते अगदी तळमळीने कामाला लागले आहेत. आगामी विधानसभा मतदारसंघात चिपळूण संगमेश्वर मधून प्रशांत यादव यांच्या रूपाने शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीला हक्काचा आमदार मिळेल अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज सोमवारी होणाऱ्या राष्ट्रवादी पार्टीच्या मेळाव्यामध्येच प्रशांत यादव यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे बोलले जात आहे. प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.
तळ कोक
णापासून राष्ट्रवादी पक्ष नव्याने बांधणीसाठी पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घातले असून येथे पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोकणात वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगाराचे साधन निर्माण करून देणारे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस उद्योजक प्रशांत यादव यांची चिपळूण संगमेश्वर-विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस वाढती लोकप्रियता लक्षात घेता शरदचंद्रजी पवार यांनी प्रशांत यादव रुपी मोहरा हेरण्याचे ठरवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासूनच खा. पवार यांनी प्रशांत यादव यांना राष्ट्रवादी पक्षाकडून लागेल ती ताकद देण्याचे ठरविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून प्रशांत यादव हे संभाव्य उमेदवार असू शकतात असे बोलले जाते तर महायुतीकडून विद्यमान आमदार शेखर निकम हे निवडणूक लढवू शकतात दरम्यान चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील या हेवीवेट फाईट (लढतीकडे) संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

आणखी वाचा