चिपळूण, दि. ०७ (प्रतिनिधी): चिपळूण शहरातील भेंडीनाका येथे मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या शॉपीचे आज वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले.
वालोपे येथील विलास पवार यांनी ही शॉपी सुरू केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, राष्ट्रवादीच्या सेवादलचे जिल्हाध्यक्ष अन्वर जबले, राष्ट्रवादीचे तालुका खजिनदार शमून घारे, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, उमेश ऊर्फ बाबूशेठ आयरे, दिपेश आयरे, दिलीप मयेकर, प्रशांत उर्फ पिंट्याशेठ मयेकर, सुधीर साळवी, राजेंद्र ऊर्फ पप्याशेठ जाधव, गणेश शिर्के, वालोपे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एकनाथ गोरिवले, निवृत्त पोलिस संजय आयरे, संदेश आयरे, किरण पवार, सुनीलशेठ पवार, सिराज साबळे, साजिद बेग, शकील पेवेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विलास पवार यांनी प्रशांत यादव यांच्यासह इतर मान्यवरांचा यथोचित सन्मान केला. वाशिष्ठी डेअरीच्या भेंडीनाक्यातील शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, तूप, ताक, फ्लेव्हर्ड मिल्क, पनीर, पेढा आणि खास गणेशोत्सवासाठी मोदकही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. चिपळूण शहरातील इतर शॉपींप्रमाणे या शॉपीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे








