टेरव रयत संघटनेतर्फे अ‍ॅड. श्री. मनोहर यादव यांचा सपत्निक जाहिर सत्कार संपन्न

टेरव वेतकोन्ड, दत्त वाडीतील 300 कार्यकर्ते उपस्थित

चिपळूण, दि. २७ : येथून जवळच असलेल्या टेरव गावचे माजी सरपंच तसेच रयत संघटना, रयत विकास संस्था (रजि) व रयत पॅनल या संस्थाचे संस्थापक अ‍ॅड. श्री. मनोहर यादव हे अलिकडेच श्री. संजय गंगाराम तांदळे यांच्याकडे कार्यभार सूपूर्त करून निवृत्त झाले. त्यामुळे त्यांचा सपत्निक शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देवून जाहीर सत्कार टेरव तांबडवाडी येथिल टेरव रयत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. संतोष कवळकर यांचे निवासस्थानी संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यमान अध्यक्ष श्री. संजय गंगाराम तांदळे यांचेसह अनेकांनी त्यांचे गुणगान केले.

या कार्यक्रमास टेरव, टेरव बुद्रुक तथा दत्तवाडी आणि वेतकोंड येथिल सुमारे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते. सत्कारास उत्तर देताना अॅड. श्री. मनोहर यादव यांनी आपण सल्लागार म्हणून सतत क्रियाशील राहू असे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणात त्यांनी बहुसंख्य बारा बालुतेदार यांचा विश्वासघात केला म्हणून माजी सचिव श्री. किशोर कदम यांना नूतन कार्यकारणीतून वगळल्याचे सांगितले. तसेच शारिरीकदृष्टया जबाबदारी सांभाळण्यास श्री. किशोर कदम सक्षम न राहिल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच विकासकामे रखडल्या बाबत चिंता व्यक्त केली. शेवटी सचिव श्री. संभाजी मोरे यांनी आभार मानले.

यावेळी मनोहर यादव यांच्या पत्नी उर्मिला यादव, मुलगा, अध्यक्ष संजय तांदळे, बारकू मोरे, सखाराम कदम, भिकाजी वासकर, अनंत कराडकर, विजय तांदळे, जयवंत तांदळे, रतन कदम यांच्यासह 300 कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी ऍड. यादव यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनाभावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा