कसे आहे न………….. आपण सगळीच माणसे एकमेकांसोबत बोलतो वाणी आणि लिखाण ही दोन माध्यम याचा विशेष जास्तीत जास्त वापर करतो. लिखाण हे असे आहे की one way आपली मत सारासार विचार करून किंवा विचार न करता केंद्रस्थानी स्व ठेऊन दुय्यम स्थान भोवतालची परिस्थिती, माणसं किंवा याच्या विरुद्ध ही लिखाण असू शकते. संवाद साधणं, कम्युनिकेट करणं , एक्स्प्रेस होण या सगळ्या गोष्टी येतात. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांसोबत बोलत असतात, त्यावेळी विचार, मत , स्वतःकडे असलेले ज्ञान याची देवाण घेवाण होणे स्वाभाविक आहे.
आता यामधे असे आहे की कोणत्याही दोन व्यकतींमध्ये संवाद होतो , कोणत्याही गोष्टी जेव्हा एकमेकांसोबत बोलल्या जातात तेव्हा त्यामध्ये भावना यांची देवाण घेवाण होतेच. कनेक्ट खूप जणांसोबत असला तरी काही गोष्टी शेअर करण्यासठी ठराविक व्यक्ती आपण हेरून ठेवल्या असतात अगदीच असे म्हणले तर वावगे ठरणार नाही की जवळची माणसं कधी नाते संबंध असलेली किंवा मैत्र जपणारी व्यक्ती बरोबर काही पर्सनल गोष्टी, पुढचे प्लॅन, सीक्रेट सांगितली जातात. फक्त बोलणं, संवाद साधणं यामधे ही इतकी गुंतागुंत आहे न विश्वास, आपले पणाची जाणिव एकमेकांप्रती. असलेलाआदर, कदर, काळजी, आपुलकी, निष्ठा , समज हे सगळेच अभिप्रेत आहे आणि असवेही.
सुरुवातीच्या काळात भावनाविवश असणारी माणसे भावनाशून्य होत आहेत हेही कटू सत्य आहे . एखादी व्यक्ती व्यक्त होत असेल तर ते ऐकणं ज्याला लीसनिंग कॅपसिटी असे म्हणले जाते पण बऱ्याच वेळा फक्त ऐकून घेणं नंतर खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण, चर्चा करण अशा खूप गोष्टी घडतात ज्या हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक केल्या जातात.
कोणाचे ऐकून घेणं हेही मोठे स्किल आहे त्यातून काही सोल्युशन,सनुभुती देता आले नाही तरी चालेल पण समोरच्या व्यक्तीच्या मनातील सल ऐकणं हे ही त्या वेळी खूप महत्वाचे असते.आपल्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट बिनदिक्कतपणे कोणी सांगत असेल तर त्या साठी आपण योग्य आहोत असे त्या व्यक्तीचे असलेले मत याला कुठेही छेद देण्याचे काम करू नये व्यक्तिपरत्वे ही ही एक जबाबदारी आहे असे म्हणेन.
देवाण घेवाण म्हणजे फक्त वस्तू आणि पैशारुपी नसते तर ती विचार ,भावना ,शब्द यांचीही असते आणि ते उच्चारत आणि ऐकत असताना काळजी घेणं ही तितकंच आवश्यक आहे.

संरक्षण अधिकारी, (महाराष्ट्र शासन) चिपळूण








