दापोलीत गौरी गणपती विसर्जनाला पावसाची हजेरी

दापोली, दि. २३ (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…अशी आर्त प्रार्थना करत लाडक्या बाप्पाला दापोली घरगुती गणपती गौरी विसर्जन करण्यात आले.पायी हळू हळू चाला मुखाने गजानन बोला…कपाळी केशरी गंध गजानना तुझा मला छंद….असे भजन म्हणत बाप्पाला भक्तांनी साश्रू नयनांनी निरोप दिला. यावर्षी घरगुती पावसाचे सावट राहिले आहे.

विसर्जनाच्या दिवशी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाल्याने पावसातच या मिरवणुका काढण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण दापोली खेड आदी तालुक्यात घरगुती गणपतींचे विसर्जन शांततेत सुरू आहे. समुद्र किनारी, नदि, तलाव येथे विसर्जन करण्यात आले. चिपळूण नगरपरिषदेने विसर्जन व्यवस्था केली होती. दापोली शहरात आसरा पुलाजवळ विसर्जन घाटावर कर्मचाऱ्यांनी हे विसर्जन केले, ही सुरक्षित व्यवस्था नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती. अनेकांनी घरच्या घरी टाकी किंवा बालडीत विसर्जन करुन पर्यावरण संवर्धन संदेश दिला.

गिम्हवणे ग्रामपंचायत हद्दीतील तळयावरही उत्साहपूर्ण वातावरण विसर्जन झाले.दापोली नगरपंचायत प्रशासनाकडून विसर्जन घाटात गणपती गौरी विसर्जन व्यवस्था प्राशासनाकडून करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सुमारे १५ हजार घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सुरक्षेचा व खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आणखी वाचा