देवरुख, दि. २३ : देवरुख, संगमेश्वर येथील नदीघाटावर पाच दिवस चाललेल्या घरगुती गणेशोत्सवातील गणरायांचे उत्साहात विसर्जन केले. भाविकांचा उत्साह मोठा होता. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..
मोरया मोरयाचा गजर करत सवाद्य मिरवणुकीने गणरायांचे विसर्जन करण्यात आहे. काही भागात नागरीकांनी एकञ येत गुलालाची उधळण करत मिरवणुका काढून गणरायांचे विसर्जन केले.
देवरुख नगरपंचायतीने देवरुख परिसरातील नदीघाटावर आपतकालीन यंञणा सज्ज ठेवली होती. देवरुख, संगमेश्वर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गणेशविसर्जन सोहळ्यावेळी पावसाने मधुन मधुन हजेरी लावली. गणेशोत्सवात मुसळधार पडलेल्या पावसामुळे नदीला भरपूर आले होते. यामुळे मोठ्या गणेशमूर्ती सहज विसर्जीत करता आल्या.
ढोल, ताशे, वाजंञी, डीजेच्या तालावर वाजत गत नाचत मिरवणुका काढण्यात आल्या. गणपती सोबत गौरीचेही विसर्जन करण्यात आले. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यानिमित्ताने चाकरमानी घरी येतात. बंद असलेल्या घरांना घरपण येते. नातेवाईक एकञ येतात. सामाजिक बांधिलकी जपली जाते. यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडला.
गणेशघाटावर भाविकांनी एकच गर्दी केली होती. सामुहिक आरत्यांच्या सूरांनी, धूप, अगरबत्ती यांच्या दरवळाने वातावरण सुंगधित झाले.








