
, सरपंच प्रीती भाटकर, जेसडब्लूचे आशिष मुसळे, फिनोलेक्सचे नरेश खरे, अल्ट्राटेकचे चंद्रशेखर उपस्थित होते.
जाधव यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. यानंतर भाट्ये समुद्र किनारा उपस्थितांनी 2 तासांच्या श्रमदानानी स्वच्छ केला. त्याचबरोबर 10 नारळाचे वृक्षारोपण करण्यात आले. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेऊन उत्तम आरोग्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. विजेत्यांना दालचिनी आणि नारळाचे रोप देऊन गौरविण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा कोषाधिकारी प्रविण बिराजदार, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सहायक नियोजन अधिकारी सुचित वंजारे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस जवान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.