मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता पदविका शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर

रत्नागिरी, दि. २२ (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) अभ्यासक्रमाचा निकाल लागला असून रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, रत्नागिरी अभ्यास केंद्राचा निकाल १००% लागला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी एकूण १६ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमात जिल्ह्यामधून सौ. मैथिली संदेश लांजेकर (८७% गुण) या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत तर व्दितीय क्रमांक श्री संदीप महादेव शीतप (८६.५०% गुण) आणि सौ. सीमा भोजने (चाचे) या ८५.२५% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

पत्रकारिता क्षेत्रात काम करण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) या कोर्सला परीक्षा माहे मे/जून २०२४ मध्ये बसलेले सर्वच विद्याथी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले आहेत. या मध्ये सौ. सुचित्रा संदीप फणसे (८३.५०% गुण) व श्री. दत्तात्रय महादेव बनगर (८३.५०% गुण) हे चौथा क्रमांकने उत्तीर्ण झाले आहेत तर पाचव्या क्रमांकने सौ. साधना सुधाकर कनावजे (८३.२५% गुण) व सौ. निलकांती धनंजय गुरव (८३.२५% गुण) यांचा आहे.
तसेच सौ. वसुंधरा नंदकुमार जाधव (८२.७५% गुण), श्री. इंद्रजित बिज्या वळवी (८१.२५% गुण), सौ. प्राजक्ता प्रशांत ओक (८१% गुण), श्री. रमेश विठ्ठल कांबळे (७६.७५% गुण), श्री. निलेश अर्जुन डांगे (७६% गुण), कु. श्रेयस संतोष रसाळ (७५.५०% गुण), सौ. नयना गजानन शिर्के (७३% गुण), श्री. प्रफुल गंगाराम पाटणे (७२.५०% गुण), श्री. उत्तम रामचंद्र पवार (७१.७५% गुण).

विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूटच्या प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे व केंद्रसंयोजक अंकुश अशोक

आणखी वाचा