शिष्यवृत्ती परीक्षेत जीजीपीएसचा पार्थ आग्रे राज्यात बारावा

रत्नागिरी दि. ०७ : येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जीजीपीएस  शाळेतील पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पार्थ विनोद आग्रे याने महाराष्ट्र राज्यात बारावा तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला.

शाळेतील पार्थ विनोद आग्रे (राज्यात 12वा, जिल्ह्यात दुसरा) श्लोक श्याम तारवे (जिल्ह्यात 28 वा), अपूर्वा विनायक ढवळे (जिल्ह्यात 36 वी) सोहम रत्नदीप चव्हाण (जिल्ह्यात 42 वा), श्रीरंग मनोज आयरे(जिल्ह्यात 65 वा ), राधेय योगेश मुळ्ये ( जिल्ह्यात 66 वा), उत्कर्ष गोपाळ चौधरी(जिल्ह्यात 71वा), सानवी अमर पालवणकर (जिल्ह्यात 74 वी), चैत्राली आनंद कुलकर्णी (जिल्ह्यात 89 वी), आराध्या मंदार कुलकर्णी (जिल्ह्यात 90 वी), आराध्या शिरीष शिंदे (जिल्ह्यात 96 वी), शिवम विजय पाटील (जिल्ह्यात 117 वा) क्रमांक प्राप्त केला. आठवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत पूर्वा आशिष चौघुले (जिल्ह्यात 6 वी), राधा प्रशांत खानोलकर( जिल्ह्यात 10 वी),सई भूषण प्रभुदेसाई (जिल्ह्यात 29 वी), गौरी बबन राठोड (जिल्ह्यात 94 वी) यांनी प्राप्त केला.

या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्था पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ अपूर्वा मुरकर गुरुकुल प्रमुख नितिन लिमये यांनी अभिनंदन केले आहे .

आणखी वाचा